संरक्षण मंत्रालय

श्रीलंका वायू दलाच्या 70 व्या वर्धापन दिन महोत्सवात भारतीय वायुसेनेचा सहभाग

Posted On: 27 FEB 2021 6:45PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 27 फेब्रुवारी 2021
 

भारतीय हवाई दलाच्या एअरोबॅटीक (हवाई कसरती) पथकाचे लढाऊ विमान तेजस सह फिक्स्ड विंग “सूर्यकिरण” आणि रोटरी विंग 'सारंग' ही विमाने, 27 फेब्रुवारी 2021 रोजी कोलंबो श्रीलंका येथे दाखल झाली . श्रीलंकेच्या हवाई दलाच्या 70 व्या वर्धापन दिन महोत्सवात सहभागी होण्यासाठी श्रीलंका हवाई दलाचे (एसएलएएफ) एअर मार्शल सुदर्शन पथीराणा यांनी भारतीय हवाई दलाला आमंत्रण दिले होते. श्रीलंकेच्या वायू  दलाच्या 70 व्या वर्धापन दिन सोहळ्याच्या भाग म्हणून सूर्यकिरण, सारंग आणि एलसीए तेजस यांचे पथक 03 ते 05 मार्च 2021 दरम्यान गॅले फेस, कोलंबो येथे होणाऱ्या एअर शोमध्ये भाग घेतील.

भारतीय हवाई दल आणि श्रीलंका हवाई दल (एसएलएएफ) यांच्यात प्रशिक्षण, व्यवहार्य आदानप्रदान आणि व्यावसायिक लष्करी शिक्षण अभ्यासक्रमांच्या माध्यमातून विविध क्षेत्रात अनेक वर्षे सक्रिय देवाणघेवाण आणि परस्पर संवाद सुरु आहे.

श्रीलंकेच्या हवाई दलाच्या (एसएलएएफ) 70 व्या वर्धापनदिन सोहळ्यामध्ये भारतीय हवाई दलाचा सहभाग हा दोन हवाई दलातील मजबूत व्यावसायिक संबंधांचे द्योतक आहे. भारतीय हवाई दलाच्या सूर्यकिरण एरोबॅटिक पथकाने (एसकेएटी) यापूर्वी श्रीलंकेच्या हवाई दलाच्या (एसएलएएफ) 50 व्या वर्धापन दिन सोहळ्यामध्ये भाग घेण्यासाठी 2001 मध्ये श्रीलंका दौरा केला होता. या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी भारतीय हवाई दलाची विमाने जेव्हा कोलंबोच्या आकाशात झेप घेतील तेव्हा पारंपारिकदृष्ट्या बळकट भारतीय हवाई दल - श्रीलंका हवाई दल (एसएलएएफ) संबंधात आणखी एक अध्याय जोडला जाईल.

 

* * *

Jaydevi PS/S.Mhatre/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1701391) Visitor Counter : 277


Read this release in: English , Urdu , Hindi , Punjabi