कृषी मंत्रालय
नॅशनल बांबू मिशनने भारतातील बांबू व्यवसायातील संधी आणि आव्हाने या विषयावर दिनांक 25-26 फेब्रुवारी 2021 रोजी आयोजित केली राष्ट्रीय परीषद
10,000 कृषी उत्पन्न संस्थांपैकी 40 बांबू कृषी उत्पन्न संस्थांना नव्या योजनेत मंजूरी
Posted On:
27 FEB 2021 5:15PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 27 फेब्रुवारी 2021
कृषी सहकार आणि शेतकरी कल्याण विभागाचा एक भाग राष्ट्रीय बांबू मिशनने 25 आणि 26 फेब्रुवारी 2021 रोजी द्रुकश्राव्य माध्यमातून भारतातील बांबू व्यवसायातील संधी आणि आव्हाने या विषयावर दोन दिवसांचे राष्ट्रीय चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते.
हा कार्यक्रम आयोजित करण्यासाठी राष्ट्रीय बांबू मिशनला नीती आयोग आणि इन्व्हेस्ट यांनी सहकार्य दिले. या क्षेत्राच्या सर्वांगीण विकासाला चालना देण्यासाठी, विचार विनिमय करणे हा या कार्यक्रमाचा हेतू होता. विविध क्षेत्रातील तज्ञ आणि हितसंबंधितांच्या चर्चासत्रातून या क्षेत्राला भेडसावणाऱ्या अचूक समस्यांवर तोडगा निघून राष्ट्रीय बांबू मिशनच्या कार्याला गती प्राप्त होईल.
मध्यम, लघु आणि सूक्ष्म उद्योग मंत्री श्री. नितिन गडकरी यांनी या परीषदेचे दिनांक 25 फेब्रुवारी 2021 रोजी उदघाटन केले. आत्मनिर्भर भारतासाठी बांबू, निर्यात प्रोत्साहन आणि जागतिक दर्जा प्राप्त करणे, यशोगाथा, उपलब्धता, नवनिर्माण, संशोधन आणि विकास, कौशल्य विकास संस्थात्मक पत प्रवेश आणि आंतरराष्ट्रीय सहकार्य या विषयांवर या परीषदेत चर्चा झाली.
* * *
S.Tupe/S.Patgaonkar/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1701359)
Visitor Counter : 267