अल्पसंख्यांक मंत्रालय

"व्होकल फॉर लोकल" मोहिमेला "जनचळवळ" करण्यासाठी "हुनर हाट", "अभूतपूर्व आणि परिपूर्ण" भूमिका निभावत आहे : केंद्रीय मंत्री मुख्तार अब्बास नक्वी

Posted On: 27 FEB 2021 5:10PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 27 फेब्रुवारी 2021

 

केंद्रीय अल्पसंख्याक व्यवहार मंत्री  मुख्तार अब्बास नक्वी यांनी सांगितले की, "व्होकल फॉर लोकल" मोहिमेला "जनचळवळ" करण्यासाठी "हुनर हाट" अभूतपूर्व आणि परिपूर्ण भूमिका निभावत आहे.

जवाहरलाल नेहरू स्टेडियम, नवी दिल्ली इथे आयोजित "हुनर हाट" मध्ये पत्रकारांशी बोलताना नक्वी म्हणाले की, "हुनर हाट" प्रतिभावंतांचा कुंभ बनत आहे.

 

20 फेब्रुवारीपासून सुरू झालेल्या "हुनर हाट" ला 12 लाखांहून अधिक लोकांनी भेट दिली आहे आणि स्वदेशी हस्तकला कारागीर आणि शिल्पकारांनी तयार केलेल्या  कोट्यवधी रुपयांच्या हस्तनिर्मित उत्पादनांची खरेदी करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या "व्होकल फॉर लोकल" मोहिमेचे ते "अभिमान प्रवर्तक" बनले आहेत, असे नक्वी यांनी सांगितले. येत्या दोन दिवसात 16 लाखांहून अधिक लोक भेट देण्याची शक्यता आहे. या "हुनर हाट" चा समारोप 1 मार्च, 2021 रोजी होईल.

 

नक्वी यांनी सांगितले की, 10 दिवसांच्या "हुनर हाट" चे उदघाटन संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते झाले.

नवी दिल्लीतील हुनर हाट मध्ये 31 हून अधिक राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील 600 हून अधिक हस्तकला कारागीर आणि शिल्पकार सहभागी झाले आहेत.

 

नक्वी म्हणाले की, "हुनर हाट" ने आतापर्यंत 5 लाख 30 हजारहून अधिक हस्तकला कारागिर, शिल्पकार आणि कलाकारांना रोजगार आणि रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिली आहे. देशाच्या स्वातंत्र्याच्या 75 वर्षांनिमित्त, आयोजित करण्यात येणाऱ्या 75 "हुनर हाट" च्या माध्यमातून केंद्रीय अल्पसंख्याक व्यवहार मंत्रालय 7 लाख 50 हजार हस्तकला कारागीर आणि शिल्पकारांना रोजगार आणि रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देईल.

 

http://hunarhaat.org आणि GeM पोर्टल या आभासी आणि ऑनलाईन व्यासपीठावरही  "हुनर हाट"  उपलब्ध आहे, जेणेकरून देश विदेशातील लोक स्वदेशी हस्तकला कारागीर आणि शिल्पकारांची उत्पादने डिजिटल आणि ऑनलाईनच्या माध्यमातून खरेदी करू शकतात, असे नक्वी यांनी सांगितले.

पुढील "हुनर हाट" भोपाळ ( 12 ते 21 मार्च 2021); गोवा ( 25 मार्च  ते 4 एप्रिल ); कोटा ( 9 एप्रिल ते 18 एप्रिल) ; सुरत ( 23 एप्रिल ते 2 मे)  इथे आयोजित केले जाईल. त्याव्यतिरिक्त यावर्षी हैदराबाद, मुंबई, जयपूर, पटना, प्रयागराज, रांची, गुवाहाटी, भुवनेश्वर, जम्मू - काश्मीर इत्यादी ठिकाणीही आयोजित केले जाईल.

 

* * *

S.Tupe/S.Chavan/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1701357) Visitor Counter : 218