नागरी उड्डाण मंत्रालय

वाढत्या हवाई वाहतुकीची गरज भागवण्यासाठी विमाने भाड्याने देण्याच्या उद्योग उभारण्यासाठी भारताने वाव द्यायला हवा– हरदीप एस पुरी

Posted On: 26 FEB 2021 10:09PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 26 फेब्रुवारी 2021

वाढत्या हवाई वाहतुकीची गरज भागवण्यासाठी  विमाने भाड्याने देण्याच्या उद्योग उभारण्यासाठी भारताने वाव द्यायला हवा, स्वतःची धोरणे आणि उत्पादने यातून नव्या विमानांसाठी, वित्तीय पाठबळ लाभेल असे नागरी हवाई वाहतूक राज्य मंत्री, स्वतंत्र कार्यभार  हरदीप एस पुरी यांनी म्हटले आहे.  इंडिया एअरक्राफ्ट लीझिंग समिट 2021 मध्ये ते आज बोलत होते. केंद्रीय वित्त मंत्री निर्मला सीतारामन  दूर दृश्य प्रणाली द्वारे कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या.

कोविड-19 महामारीने जागतिक पातळीवर आर्थिक घडामोडी ठप्प्प झाल्या असताना आणि जागतिक व्यापाराच्या विविध पैलूंवर परिणाम झाला असतानाही  भारतीय हवाई वाहतूक क्षेत्राने लवचिकता आणि काहीशी उभारी दर्शवली आहे. भारतीय हवाई वाहतूक क्षेत्र पूर्वपदावर येण्याच्या मार्गावर असून प्रवासी ये-जा आणि कार्गो या क्षेत्रात कोविड पूर्व स्थितीला  येण्याच्या दृष्टीने लक्षणे दिसत आहेत.या पार्श्वभूमीवर विमाने भाड्याने देणे, एमआरओ ऑपरेशन याद्वारे भारतात नवा व्यवसाय आणण्यासाठी  प्रयत्न करण्यात येत असल्याचे हरदीप पुरी यांनी सांगितले.

भारताच्या हवाई वाहतूक क्षेत्राच्या वाढीची शक्यता लक्षात घेता येत्या 20 वर्षात भारताला 20,40,000 कोटी रुपयांच्या 1,750 ते 2,100 विमानाची आवश्यकता भासेल असे त्यांनी सांगितले.

भारताने विमान लीझिंग  आणि वित्तपुरवठा  यासंदर्भात आयर्लंड, चीन,होंगकॉंग, सिंगापूर  यांच्या तोडीची अतिशय प्रभावी पद्धती निर्माण केली आहे.

 

Jaydevi PS /N.Chitale/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1701248) Visitor Counter : 220