राष्ट्रपती कार्यालय
गुरू रविदास यांच्या जयंतीच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपतींचे अभिवादन
Posted On:
26 FEB 2021 6:13PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 26 फेब्रुवारी 2021
भारताचे राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांनी गुरू रविदास यांच्या जयंतीच्या पूर्वसंध्येला त्यांच्या अनुयायांना शुभेच्छा दिल्या आहेत.
“गुरु रविदास जयंतीच्या पावन प्रसंगी मी त्यांच्या अनुयायांना अभिवादन करतो आणि शुभेच्छा देतो” असे राष्ट्रपतींनी एका संदेशामध्ये म्हटले आहे.
गुरु रविदास एक महान संत आणि धार्मिक सुधारक होते, त्यांनी आपले जीवन मानवतेच्या सेवेसाठी वाहिले. आपल्या शिकवणुकीद्वारे त्यांनी मानवतेला समानता, न्याय, शांती आणि सद्भावनेचा संदेश दिला. त्यांनी आयुष्यभर सामाजिक सौहार्द आणि बंधुता या तत्त्वांच्या प्रसारासाठी काम केले.
या महान संतांच्या जयंतीनिमित्त, त्यांच्या शिकवणुकीतून प्रेरणा घेण्याचा संकल्प करूया आणि मानवतेच्या हितासाठी समाजातील बंधुत्व बळकट करण्यासाठी प्रयत्न करूया.
राष्ट्रपतींचे हिंदी भाषण पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
S.Tupe/V.Joshi/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1701156)
Visitor Counter : 171