ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक पुरवठा मंत्रालय
राष्ट्रीय ग्राहक विवाद निवारण परीषदेद्वारे ग्राहकांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी दिनांक 7 सप्टेंबर 2020 पासून सुरू केलेले ई-दाखिल (E-Daakhil portal) पोर्टल, 15 राज्ये/केंद्रशासित प्रदेशात आता कार्यरत
Posted On:
26 FEB 2021 5:52PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 26 फेब्रुवारी 2021
राष्ट्रीय ग्राहक विवाद निवारण परीषदेद्वारे ग्राहकांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी दिनांक 7 सप्टेंबर 2020 पासून सुरू केलेले ई-दाखिल (E-Daakhil portal) पोर्टल,15 राज्ये/केंद्रशासित प्रदेशात आता कार्यरत झाले आहे. ग्राहक व्यवहार विभाग आता राज्यांचे ई फायलींग पोर्टलसाठी अग्रक्रमाने पाठपुरावा करत आहे.
राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्राने (NIC) ग्राहकांच्या तक्रारी डिजिटल पध्दतीने दाखल करण्यासाठी edaakhil.nic.in नावाचे पोर्टल विकसित केले आहे. ग्राहकांच्या तक्रारी डिजिटल पध्दतीने नोंदविण्यासाठी या पोर्टलवर ई नोटीस, तक्रारीचा दस्तावेज डाऊनलोड करणे, दूरदृश्य पध्दतीने सुनावणी करण्याची लिंक, प्रतिपक्षाकडून लेखी उत्तराची प्रतिक्रिया, तक्रारदाराने फेरदावा करणे, एसएमएस/ई-मेल द्वारे सतर्कता दाखविणे अशा बाबींचा समावेश आहे.
ई-दाखिल पोर्टल ग्राहकांना आणि त्यांच्या वकिलांना कोणत्याही ठिकाणाहून आपली तक्रार आणि त्या सोबत भरण्याची आवश्यक शुल्क ऑनलाईन पध्दतीने भरण्याचे अधिकार देते.
S.Thakur/S.Patgaonkar/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1701147)
Visitor Counter : 246