उपराष्ट्रपती कार्यालय
बलशाली, आनंदी आणि समृद्ध भारत उभारण्याचे उपराष्ट्रपतींचे आवाहन
तिरुवनंतपुरममध्ये पहिले पी. परमेश्वरन स्मृती व्याख्यान दिले
श्री परमेश्वरजींना वाहिली श्रद्धांजली, ; त्यांचे जीवन आपल्याला देशाला प्राधान्य देण्यासाठी प्रेरणा देते -उपराष्ट्रपती
पाच हजार वर्षे जुन्या भारताच्या बौद्धिक परंपरेने विविधतेतही मूलभूत एकता जपली - उपराष्ट्रपती
Posted On:
25 FEB 2021 10:55PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 25 फेब्रुवारी 2021
उपराष्ट्रपती. एम. व्यंकय्या नायडू यांनी आज लोकांना श्री परमेश्वरजी यांनी दाखविलेल्या मार्गावर चालण्याचे आणि एक बलशाली, आनंदी व समृद्ध भारत घडवण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन केले.
आज तिरुवनंतपुरम येथे भारतीय विचार केंद्रमच्या वतीने आयोजित पहिल्या पी. परमेश्वर स्मृती व्याख्यानमालेत भाषण करताना उपराष्ट्रपतींनी जातीयवाद आणि भ्रष्टाचारासारख्या सामाजिक दुष्प्रवृत्तींपासून मुक्त अशा भारताच्या गरजेवर भर दिला आणि समृद्ध सांस्कृतिक आणि आध्यात्मिक वारशाचा अभिमान बाळगण्याचे आवाहन केले. श्री परमेश्वरजींना श्रद्धांजली वाहताना नायडू यांनी त्यांचे वर्णन तपस्वी आणि सर्वोत्कृष्ट मानवतावादी असे केले आणि त्यांचे जीवन आपल्याला सर्व गोष्टींपेक्षा देशाला प्राधान्य देण्याची प्रेरणा देते असे सांगितले.
केरळमध्ये रामायण मास पाळण्याच्या विस्मृतीत गेलेल्या परंपरेला पुनरुज्जीवित करण्यात त्यांचे मोलाचे योगदान असल्याचे नमूद करून उपराष्ट्रपती म्हणाले की, त्यांच्या लेखन, भाषण व इतर बौद्धिक कार्यातून श्री परमेश्वरजी यांनी केरळमधील बौद्धिक प्रवृत्तीचे रूप बदलले. ते एक उत्तम लेखक, वक्ते, कवी आणि सामाजिक तत्ववेत्ता होते, असे नायडू म्हणाले.
उपराष्ट्रपती म्हणाले की या बौद्धिक परंपरेच्या मजबूत पार्श्वभूमीमुळेच,मधल्या काळातील अनेक चढ उतारानन्तरही भारताचे सुसंकृत राष्ट्र म्हणून अस्तित्व कायम आहे.
संस्कृती संदर्भात भारताची बौद्धिक परंपरा पाच हजार वर्षांहून अधिक काळ टिकून राहिल्याचे सांगून ते म्हणाले की ही बौद्धिक परंपरा भारताच्या सामाजिक रचनेत गुंफलेली आहे आणि विविधतेतही भारताचे मूलभूत ऐक्य टिकवून ठेवण्यास यामुळे मदत झाली. महान संस्कृत महाकाव्ये ,महाभारत आणि रामायण हा हिंदू विचार आणि तत्त्वज्ञानाचा आधार असल्याचे नायडू यांनी अधोरेखित केले. ते म्हणाले की भारत आणि आशियातील धार्मिक आणि सांस्कृतिक जीवनावर या दोन महाकाव्यांचा खोलवर परिणाम झाला आहे.
श्री परमेश्वरजी याना एक महान संस्थापक म्हणून संबोधताना त्यांनी दीनदयाल संशोधन संस्थेचे संचालक, भारतीय विचार केंद्राचे संस्थापक आणि विवेकानंद केंद्राचे अध्यक्ष या नात्याने त्यांनी केलेल्या महत्वपूर्ण योगदानाचा उल्लेख केला. राष्ट्रसेवेच्या सन्मानार्थ त्यांना 2004 मध्ये पद्मश्री आणि 2018.मध्ये पद्मविभूषण पुरस्कार तसेच परमेश्वरजीची असंख्य प्रकाशने यांची त्यांनी यादी जाहीर केली.
उपराष्ट्रपती म्हणाले की, त्यांचा साधेपणा , विद्वत्ता आणि ज्या प्रकारे त्यांनी लोकांची सेवा केली त्यामुळेच श्री परमेश्वरजी त्यांचे व्यक्तिशः आवडते व्यक्तिमत्व आहे.
केरळचे राज्यपाल आरिफ मोहम्मद खान, भारतीया विचार केंद्रमचे अध्यक्ष डॉ. एम. मोहनदास हे या कार्यक्रमाला उपस्थित होते.
* * *
Jaydevi PS/S.Kane/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1700943)
Visitor Counter : 154