सामाजिक न्याय आणि सबलीकरण मंत्रालय
रतनलाल कटारिया यांनी डॉ.आंबेडकर आंतरराष्ट्रीय केंद्रात नव्याने समाविष्ट झालेल्या पोस्ट डॉक्टरल फेलोज यांनी देशाच्या प्रगतीसाठी हातभार लावावा अशी विनंती केली
Posted On:
25 FEB 2021 9:15PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 25 फेब्रुवारी 2021
डॉ. आंबेडकर आंतरराष्ट्रीय केंद्राने (डीएआयसी), सामाजिक न्याय आणि सबलीकरण मंत्रालयाच्या आर्थिक मदतीखाली डॉ. आंबेडकर डॉक्टरेट फेलोशिप आणि डॉ. आंबेडकर पोस्ट-डॉक्टरेट फेलोशिप (राष्ट्रीय आणि परदेशी) सुरू केली आहे. डीएआयसीने फेब्रुवारी 2021 मध्ये 30 पोस्ट डॉक्टरेट स्कॉलर्सची निवड केली होती, त्यापैकी 28 शिष्यवृत्तीधारक देशातील होते तर 2 परदेशी शिष्यवृत्तीधारक आहेत.
आज नवी दिल्ली येथे डीएआयसीच्या पोस्ट डॉक्टरल फेलोज च्या स्वागत समारंभात संबोधित करताना सामाजिक न्याय आणि सबलीकरण राज्यमंत्री रतनलाल कटारिया यांनी डॉ. आंबेडकर आंतरराष्ट्रीय केंद्रात (डीएआयसी) नव्याने समाविष्ट झालेल्या पोस्ट डॉक्टरल फेलोज यांनी या संधीचा खर्या अर्थाने लाभ घेऊन 'सबका साथ सबका विकास' या दृष्टिकोनातून देशाच्या प्रगतीत हातभार लावण्याचे आवाहन केले.
“या दोन वर्षात देशातील सध्याचे सामाजिक व आर्थिक प्रश्न समजून घेऊन त्यावर संशोधन करून त्या प्रश्नांचा देशाला प्रभावीपणे मुकाबला करण्यासाठी मार्ग सुचवावेत,” असे कटारिया म्हणाले.
पंतप्रधानांच्या दृष्टीकोनातून डीएआयसी लवकरच प्रतिष्ठित राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय संस्थांच्या मांदियाळीत सामील होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
सामाजिक आणि आर्थिक विषयांवर संशोधन करण्यासाठी महत्त्वपूर्ण स्थान म्हणून डॉ. आंबेडकर आंतरराष्ट्रीय केंद्राचे (डीएआयसी) उद्घाटन पंतप्रधानांनी 7 डिसेंबर, 2017 रोजी केले होते.
* * *
Jaydevi PS/V.Joshi/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1700918)
Visitor Counter : 78