गृह मंत्रालय
राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांनी, भारतरत्न आणि गुजरातचे सुपुत्र सरदार वल्लभभाई पटेल यांचे नाव असलेल्या अहमदाबाद इथल्या भव्य स्पोर्टस एन्क्लेवचे केले भूमिपूजन
Posted On:
24 FEB 2021 11:00PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 24 फेब्रुवारी 2021
राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांनी, आज गुजरातमधल्या अहमदाबाद इथे भव्य स्पोर्टस एन्क्लेवचे भूमिपूजन केले. भारतरत्न आणि गुजरातचे सुपुत्र सरदार वल्लभभाई पटेल यांचे नाव या एन्क्लेवला देण्यात आले आहे.
आजचा दिवस हा भारताच्या क्रीडा इतिहासातला सुवर्ण दिन असल्याचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यावेळी बोलताना सांगितले. स्टेडीयमचे उद्घाटन आणि स्पोर्टस एन्क्लेव्हचे भूमिपूजन केल्याबद्दल त्यांनी राष्ट्रपतींचे मनःपुर्वक आभार मानले. भारताचे लोह पुरुष, भारतरत्न सरदार पटेल यांच्या नावाच्या भव्य क्रीडा एन्क्लेवचे भूमिपूजन राष्ट्रपतींच्या हस्ते झाले. अत्याधुनिक जागतिक सुविधा आणि जगातले सर्वात मोठे क्रिकेट स्टेडीयम असलेल्या या स्टेडीयमचे नाव नरेंद्र मोदी स्टेडीयम असेल असे शहा यांनी सांगितले. या स्टेडीयममध्ये 11 खेळपट॒टया असतील, जगातल्या कोणत्याही स्टेडीयममध्ये इतक्या खेळपट॒टया नाहीत. चार ड्रेसिंग रूम असून जोरदार पावसानंतरही अर्ध्या तासात सामना सुरु करता येणार आहे. एलइडी लाईट बसवण्यात आल्यामुळे खेळपट्टीवर खेळाडूची सावली पडणार नाही त्याच बरोबर 40 ते 50 टक्के विजेची बचतही होणार आहे. उच्च तंत्रज्ञान युक्त मिडिया रूम उभारण्यात आल्यामुळे इथे होणाऱ्या क्रीडा स्पर्धांचे संपूर्ण जगभरात प्रसारण करणे शक्य होईल असे शहा म्हणाले.
इथे उभारण्यात येणारे सरदार वल्लभभाई पटेल स्पोर्टस एन्क्लेव हा महत्वाकांक्षी प्रकल्प असल्याचे शहा यांनी सांगितले. 233 एकरावर बांधण्यात येणारे हे स्पोर्टस एन्क्लेव देशातले सर्वात मोठे एन्क्लेव असेल. हे एन्क्लेव जागतिक तोडीच्या सुविधांनी युक्त राहील. नारायणपुरा इथल्या 18 एकर जागेवरच्या नव्या क्रीडा संकुलाचाही यामध्ये समावेश राहील.
अधिक माहितीसाठी इथे क्लिक करा
* * *
M.Chopade/N.Chitale/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1700692)
Visitor Counter : 194