ऊर्जा मंत्रालय

मोठ्या धरणांसाठीच्या आंतरराष्ट्रीय धरण परिषदेतर्फे (आयसीओएलडी) आयोजित धरण आणि नदीपात्रांचा शाश्वत विकास या विषयावरील परिसंवादाचे उद्‌घाटन


24-27 फेब्रुवारी दरम्यान चार दिवसांचे चर्चासत्र

पॅरिस हवामान करारातील भारताच्या वचनबद्धतेचा ऊर्जामंत्री यांनी केला पुनरुच्चार

Posted On: 24 FEB 2021 8:51PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 24 फेब्रुवारी 2021

मोठ्या धरणांसाठीच्या आंतरराष्ट्रीय धरण परिषदेतर्फे (आयसीओएलडी) आयोजित धरण आणि नदीपात्रांचा शाश्वत विकास या विषयावरील परिसंवादाचे उद्‌घाटन प्रमुख अतिथी गजेंद्रसिंह शेखावत, जलशक्ती मंत्री आणि अध्यक्षस्थानी असलेले आर.के.सिंह ऊर्जा आणि नवीकरणीय ऊर्जा राज्यमंत्री ( स्वतंत्र प्रभार) यांच्या हस्ते आज झाले.

केंद्रीय जल आयोग (सीडब्ल्यूसी), धरण पुनर्वसन सुधारणा प्रकल्प (डीआरआयपी), राष्ट्रीय जलविज्ञान प्रकल्प (NHP) यांच्या सहकार्याने मोठ्या धरणांसाठीच्या आंतरराष्ट्रीय धरण परिषदेच्या वतीने नवी दिल्लीत 'धरण आणि नदीपात्रांचा शाश्वत विकास' या विषयावरील संमिश्र  चर्चासत्र 24 ते 27 फेब्रुवारी , 2021 दरम्यान आयोजित केले आहे. देश विदेशातील 300 पेक्षा अधिक प्रतिनिधी या चर्चासत्रात सहभागी झाले आहेत. ऊर्जामंत्र्यांनी  आपल्या भाषणात सांगितले की, जल, सौर, पवन आणि जैव ऊर्जा यांसारख्या जीवाश्म इंधनानाद्वारेआपल्या ऊर्जा क्षेत्रात  आम्ही  विविधता आणत आहोत. हे ऊर्जेचे स्रोत स्वच्छ आणि किफायतयशीर आहेत, असे त्यांनी नमूद केले. पॅरिस हवामान करारातील भारताच्या वचनबद्धतेचा त्यांनी पुनरुच्चार केला. ते पुढे म्हणाले की, आपले दरडोई उत्पन्न जागतिक सरासरीच्या एक तृतीयांश असूनही जागतिक तापमानवाढ 2 अंश सेल्सिअसच्यावर जाण्यापासून रोखण्याच्या मार्गावर कृती करणारी आपणच मोठी अर्थव्यवस्था आहोत.

भारतीय धरण अभियांत्रिकी व्यावसायिक आणि संस्थांना आपले अनुभव ,कल्पना तसेच  नवी सामग्री, बांधकाम तंत्रज्ञान, तपासणी तंत्रातील प्रगती, उत्तम अभियांत्रिकी कार्यपद्धती, धरण सुरक्षा आदी विषयांवरील नवीन घडामोडी सांगण्याच्या दृष्टीने उत्तम संधी उपलब्ध करून देण्यासाठी या परिसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे. संस्थात्मक बळकटीकरण आणि राष्ट्रीय जल विज्ञान प्रकल्प (NHP) यासह मोठ्या धरणांच्या सुरक्षा आणि कार्यक्षमता, त्या धरणांशी संबंधित अन्य संरचना सुधारण्यासाठी  जलशक्ती मंत्रालयाच्या पथदर्शी कार्यक्रमाची कामगिरी असलेला धरण पुनर्वसन सुधारणा प्रकल्प (DRIP) आणि राष्ट्रीय जलविज्ञान प्रकल्प (NHP)जागतिक बँकेच्या सहकार्याने, जागतिक धरण समुदायाला सादर केला आहे. हा समुदाय भारताचा विकास आणि धरण पुनर्वसन सुधारणा प्रकल्प (DRIP) आणि राष्ट्रीय जलविज्ञान प्रकल्प ( NHP)च्या यशस्वी अंमलबजावणीच्या दृष्टीने उत्सुक आहे.

43 देशांमधील, पूर्ण मजकूर असलेली 285 तांत्रिक कागदपत्रे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय धरण तज्ज्ञांना प्राप्त झाली आहेत. यापैकी 130 सादरीकरणे 27 तांत्रिक सत्रांच्या माध्यमातून सादर केली जातील, याशिवाय 30 हून अधिक सादरीकरणे 27 फेब्रुवारी 2021 रोजी आयोजित आभासी व्यासपीठाच्या माध्यमातून आयोजित सात कार्यशाळांमध्ये सादर होतील.धरणाची रचना ,कामगिरी ,पुनर्वसन आणि पर्यावरणीय बाबींशी संबंधित अनुभवांचे  आणि नवीन घडामोडींचे  आदान- प्रदान या सादरीकरणाच्या माध्यमातून होईल, ज्यामुळे या विषयावरील ज्ञानाला नक्कीच नवा आयाम मिळेल. धरण प्रकल्पांमध्ये नाविन्यपूर्ण वित्तपुरवठा ,धरण अभियांत्रिकी मधील भू- संश्लेषण वापर यावरील विशेष सत्रा व्यतिरिक्त सहा कार्यशाळा विविध विषयांवर आयोजित केल्या आहेत. या परिसंवादा दरम्यान, धरणे आणि नदीपत्रांचा विकासाच्या दृष्टीने  21 व्या शतकातील आव्हानांचा सामना करण्यासाठीचे तंत्रज्ञान प्रदर्शन आयोजित केले आहे.

 

S.Thakur/S.Chavan/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1700593) Visitor Counter : 209