अर्थ मंत्रालय

ब्रिक्स वित्त मंत्री आणि मध्यवर्ती बँकांच्या डेप्युटी गव्हर्नरांच्या पहिल्या बैठकीचे भारताने यजमानपद भूषवले

Posted On: 24 FEB 2021 8:05PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 24 फेब्रुवारी 2021

 

भारताने आज नवी दिल्लीत ब्रिक्स वित्त मंत्री आणि मध्यवर्ती बँकांच्या डेप्युटी गव्हर्नरांच्या बैठकीचे व्हर्च्युअली यजमानपद भूषवले. आर्थिक व्यवहार सचिव तरुण बजाजभारतीय रिझर्व्ह बँकेचे डेप्युटी गव्हर्नर मायकेल पात्रा यांनी सहअध्यक्षपद भूषवले.  सहभागी झालेल्यांमध्ये  ब्रिक्स वित्तमंत्री आणि ब्राझील, रशिया, चीन आणि दक्षिण आफ्रिकेच्या मध्यवर्ती बँकेच्या डेप्युटी गव्हर्नरांचा समावेश होता.

2021 मध्ये ब्रिक्स 15 वा वर्धापन दिन साजरा करत असताना भारताने ब्रिक्सचे अध्यक्षपद स्वीकारले आहे. ब्रिक्स @ 15 आंतर -ब्रिक्स सहकार्याच्या संकल्पनेअंतर्गत, सातत्य, एकत्रीकरण आणि एकमत याद्वारे सहकार्य मजबूत करण्यावर  भारताचा दृष्टिकोन केंद्रित आहे.

2021 मध्ये भारताच्या अध्यक्षतेखाली ब्रिक्स वित्तीय सहकार्यावरील ही पहिली बैठक होती. या बैठकीत भारताने आर्थिक सहकार्याच्या कार्यक्रमांतर्गत प्राधान्यक्रम आणि 2021 दरम्यान चर्चेसाठीचे मुद्दे उदा. जागतिक आर्थिक दृष्टीकोन आणि कोविड -19 ला प्रतिसाद, सामाजिक पायाभूत  वित्त पुरवठा आणि  डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर, न्यू डेव्हलपमेंट बँक (एनडीबी) उपक्रम, एसएमई आणि वित्तीय समावेशकतेसाठी  फिनटेक, ब्रिक्स आपत्कालीन राखीव व्यवस्था  (सीआरए) आणि इतर मुद्दे सामायिक केले.

 

S.Thakur/S.Kane/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1700573) Visitor Counter : 185