नौवहन मंत्रालय
2 मार्च 2021 रोजी दुसऱ्या मेरीटाईम इंडिया समिटचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन
2 ते 4 मार्च 2021 या कालवधीत दुसऱ्या मेरिटाईम इंडिया समिटचे आयोजन
समिटच्या पहिल्या दिवशी ‘महाराष्ट्रातील गुंतवणुकीच्या संधी’
Posted On:
24 FEB 2021 6:24PM by PIB Mumbai
मुंबई, 24 फेब्रुवारी 2021
बंदर आणि सागरी क्षेत्रातील आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत गुंतवणूकीला चालना देण्यासाठी बंदर, नौवहन आणि जलमार्ग मंत्रालयाने 2 मार्च ते 4 मार्च 2021 या कालावधीत www.maritimeindiasummit.in या व्हर्चुअल प्लॅटफॉर्मवर ‘मेरीटाईम इंडिया समिट 2021’ चे आयोजन केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी 2 मार्च 2021 रोजी सकाळी 11 वाजता दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून या परिषदेचे उद्घाटन करतील.
“भारताला जागतिक सागरी क्षेत्रात आघाडीवर नेणे हे या परिषदेचे मुख्य उद्दीष्ट आहे. विविध संस्थांशी सामंजस्य करारांवर स्वाक्षरी करण्याचे काम आधीच सुरू झाले आहे. मुंबई पोर्ट ट्रस्टने आतापर्यंत 7400 कोटी रुपयांच्या सामंजस्य करारांवर स्वाक्षऱ्या केल्या आहेत. या शिखर परिषदेचा भाग म्हणून 20,000 कोटी रुपये मूल्याचे सामंजस्य करार होण्याची अपेक्षा असल्याचे मुंबई पोर्ट ट्रस्टचे अध्यक्ष राजीव जलोटा यांनी सांगितले.
एमआयएस 2021, धोरण निर्माते, वरिष्ठ सरकारी अधिकारी, देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय गुंतवणूकदार, या क्षेत्रातील तज्ञ, जहाज कंपन्यांचे मालक, जगभरातील प्रमुख बंदरांचे प्रतिनिधी यासारख्या सागरी क्षेत्रातील विविध संबंधितांसाठी एक अनोखे व्यासपीठ उपलब्ध करुन देईल तसेच भारतातील किनारपट्टीलगतची राज्य सरकारे देखील यात सहभागी होतील अशी माहिती अध्यक्षांनी दिली.
“परिषदेच्या उद्घाटनाच्या दिवशी (2 मार्च) ‘महाराष्ट्रातील गुंतवणुकीच्या संधी’ या विषयावरील सत्राचे आयोजन केले आहे. आभासी शिखर परिषदेसाठी सुमारे 6,96,000 सहभागींनी आधीच नोंदणी केली आहे, ” असे जलोटा यांनी सांगितले. 20 देशांतील प्रख्यात उद्योजक या परिषदेत सहभागी होऊन भारतीय सागरी क्षेत्रात असलेल्या व्यवसायाच्या संभाव्य संधींची चाचपणी करतील, अशी अपेक्षा आहे.
या परिषदेच्या उद्घाटन सत्रामध्ये अफगाणिस्तान, रशिया, उझबेकिस्तान, इराण आणि आर्मेनियाचे मंत्री सहभागी होतील आणि व्यापार प्रोत्साहन आणि प्रादेशिक संपर्कातून बंदरातील पायाभूत सुविधांचा विकास आणि व्यवसायाला चालना या विषयावर चर्चा होईल.
समारोप सत्र, विशेष आणि विविध विषयावरील सत्रांचे आयोजन केले असून संबंधित क्षेत्रातील आंतरराष्ट्रीय तज्ञ यात भाग घेतील. किनारपट्टीलगत असलेल्या प्रत्येक राज्यावर भर देणाऱ्या सत्रांचे देखील आयोजन करण्यात येणार आहे. महाराष्ट्र, गुजरात, ओदिशा, आंध्र प्रदेश, कर्नाटक, तामिळनाडू, अंदमान आणि निकोबार आणि लक्षद्वीप ही 8 राज्ये/केंद्रशासित प्रदेश आधीच एमआयएस-2021 चे भागीदार आहेत.
प्रस्तावित शिखर परिषद भारतीय आणि आंतरराष्ट्रीय बंदरे, नौवहन आणि मेरीटाईम कंपन्या, गुंतवणूकदार आणि इतर भागधारक यांच्याशी संवाद आणि सहकार्यासाठी व्यासपीठाचे आयोजन करेल. या परिषदेमध्ये बंदरे, नौवहन आणि जलमार्ग राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) सह एक विशेष सीईओ परिषद देखील समाविष्ट असेल.
एमआयएस -2021 4 मार्च 2021 रोजी चाबहार दिन साजरा करेल. हिंदी महासागरात वावर करण्यासाठी चाबहार बंदर हे इराणचे सर्वात जवळचे आणि सोयीचे स्थान आहे.
फिक्की अर्थात फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री या परिषदेची इंडस्ट्री पार्टनर आहे तर अर्न्स्ट अँड यंग हे माहिती भागीदार (नॉलेज पार्टनर) म्हणून काम करत असल्याची माहितीही देण्यात आली.
अधिक माहितीसाठी, एमआयएस -2021 च्या www.maritimeindiasummit.in संकेतस्थळाला भेट द्या
पत्रकार परिषदेत अध्यक्षांनी सादर केलेले पीपीटी पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
संपर्क तपशील:
1) प्रदर्शनासाठी
विनय कुमार गुप्ता,
सहाय्यक संचालक, फिक्की मोबाईल: + 91-9910103354
ईमेल: vinay.gapt@ficci.com
2) परिषदेसाठी
श्री आशुतोष,
फिक्की मोबाईल: + 91-9650903299
ईमेल: infra@ficci.com
3) प्रदर्शक नोंदणीसाठी: https://www.maritimeindiasummit.in/exhibitor-registrations.php
4) अभ्यागत नोंदणीसाठी : https://www.maritimeindiasummit.in/visitor-registrations.php
S.Patil/S.Mhatre/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1700509)
Visitor Counter : 193