श्रम आणि रोजगार मंत्रालय
ईएसआयसीने विमाधारक कामगार/विमाधारक महिलांना चांगल्या सेवा पुरवण्यासाठी अनेक महत्वाचे धोरणात्मक निर्णय घेतले
Posted On:
23 FEB 2021 8:13PM by PIB Mumbai
कर्मचारी राज्य विमा महामंडळ (ईएसआयसी) ने केंद्रीय कामगार व रोजगार राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) संतोषकुमार गंगवार यांच्या अध्यक्षतेखाली 22.02.2021 रोजी झालेल्या 184 व्या बैठकीत सेवा यंत्रणा सुधारण्यासाठी व विमाधारक कामगारांना लाभदायक वैद्यकीय पायाभूत सुविधा बळकट करण्यासाठी अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहेत.
ठळक मुद्दे
- मातृत्वाचा लाभ घेणार्या विमाधारक महिलांना योगदान अटींमध्ये सूट
- जानेवारी ते जून’ 2021 या कालावधीत आजारपण आणि मातृत्व लाभ मिळण्यासाठी योगदान अटी शिथिल .
- ईएसआयसी उत्तराखंडमधील हरिद्वार येथे 50 सुपर स्पेशालिटी बेड्ससह 300 खाटांचे रुग्णालय बांधणार
- ईएसआयसी आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम येथे अतिरिक्त 50 बेड असलेल्या एसएसटी विंगसह 350 खाटांचे रूग्णालय बांधणार
- हैदराबाद, तेलंगणा येथे ईएसआयसी सुपर स्पेशालिटी रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालयात निगेटिव्ह प्रेशर आयसीयूची स्थापना.
- ईएसआय महामंडळाने सन 2020-21 आणि 2021-22 या वर्षासाठी सुधारित अंदाज व अंदाजपत्रक आणि 2021-22 या वर्षाच्या कामगिरी अंदाजपत्रकास मान्यता दिली.
ईएसआयसीच्या 2020-21 आणि 2021-22 या वर्षासाठी सुधारित अंदाज आणि अर्थसंकल्पीय तरतूदीला आणि 2021.22 या वर्षासाठी कामगिरी अंदाजपत्रकाला मंजुरी -
ईएसआय महामंडळाने बैठकीत 2020-21 आणि 2021-22 या वर्षासाठी सुधारित अंदाज आणि अर्थसंकल्पीय तरतूद आणि 2021-22 या वर्षाच्या कामगिरी अंदाजपत्रकाला मंजुरी दिली आहे.
या व्यतिरिक्त, सेवा वितरणाच्या यंत्रणेत सुधारणा करण्याशी संबंधित इतर सुमारे 25 बाबीही नोंदवण्यात आल्या आणि त्याना मान्यता देण्यात आली.
कामगार व रोजगार मंत्रालयाचे सचिव अपूर्व चंद्रा, अतिरिक्त सचिव अनुराधा प्रसाद, आणि ईएसआयसीचे महासंचालक, ईएसआय महामंडळाचे सदस्य, ईएसआयसीच्या वित्त आयुक्त संध्या शुक्ला, ईएसआयसीच्या सीव्हीओ गरिमा भगत,आणि इतर या बैठ्कीला उपस्थित होते.
Jaydevi PS/S.Kane/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1700285)
Visitor Counter : 244