संरक्षण मंत्रालय

नौदलाच्या पूर्व विभागाचे  फ्लॅग ऑफिसर कमांडिंग म्हणून रियर ॲडमिरल तरुण सोबती यांचे पदभार ग्रहण

Posted On: 23 FEB 2021 6:03PM by PIB Mumbai

 

नौदलाच्या पूर्व विभागाचे फ्लॅग ऑफिसर कमांडिंग म्हणून रियर ॲडमिरल तरुण सोबती, VSM, यांनी रियर ऍडमिरल संजय वात्स्यायन, AVSM, NM, यांच्याकडून आज पदभार स्वीकारला. विशाखापट्टणम इथल्या नौदल तळावर दिनांक 23 -2 -2021 रोजी झालेल्या एका दिमाखदार समारंभात हा पदभार स्वीकारला गेला.

1 जुलै 1988 रोजी नौदलात दाखल झालेले रियर ॲडमिरल तरुण सोबती नौकानयन शास्त्र तसेच दिशादर्शक शास्त्रातले तज्ञ आहेत.  पुण्याच्या खडकवासला इथल्या राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीतून तसेच पॅरिसच्या संरक्षण महाविद्यालयातुन शिक्षण घेतल्यानंतर मुंबईच्या नौदल युद्धशास्त्र महाविद्यालयातून त्यांनी आपले शिक्षण पूर्ण केले.

बत्तीस वर्षांच्या उज्वल कारकिर्दीत त्यांनी आय एन एस किरपान व आयएनएस मैसूर चे नौकानयन अधिकारी, आयएनएस विराट चे दिशादर्शक अधिकारी व आयएनएस दिल्ली या क्षेपणास्त्र नाशक जहाजाचे कार्यकारी अधिकारी म्हणून काम पाहिले. आयएनएस निशंक हे क्षेपणास्त्र वाहू जहाज आणि  आयएनएस कोरा ही मिसाईल कॉर्व्हेट देखील त्यांनी कमांड केली. तसेच आयएनएस कोलकाता या जहाजाचे ते पहिले कमांडिंग अधिकारी होते.

M.Iyengar/U.Raikar/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1700240) Visitor Counter : 199


Read this release in: English , Urdu , Hindi , Tamil