वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय
मुंबई सीमाशुल्क विभागाने 15 कोटी रुपयांच्या तस्करीच्या वस्तू जप्त केल्या
Posted On:
23 FEB 2021 7:38PM by PIB Mumbai
मुंबईच्या सीमाशुल्क विभाग-III, ने टपालमार्गे तस्करी केलेल्या आय-फोन, ड्रोन, ऍपल घड्याळे आणि सिगारेटचा लक्षणीय वाणिज्यिक साठा जप्त केला आहे. मिळालेल्या माहितीच्या आधारे कारवाई करताना, बॅलर्ड इस्टेट मुंबईच्या (प्रतिबंधात्मक) आयुक्तालयाच्या शोध आणि गुप्तवार्ता विभागाने खालील ठिकाणी एकत्रितपणे तस्करीविरोधी कारवाई केली.
1) एमआयडीसी पोस्ट ऑफिस, चकाला, अंधेरी, फॉरेन पोस्ट ऑफिस
2) विदेश डाक भवन, बॅलार्ड इस्टेट मुंबई
3) एअर पार्सल सॉर्टींग ऑफिस, विलेपार्ले (पू ), मुंबई.
कार्यालयाने चकाला एमआयडीसी पोस्ट ऑफिस, चकाला, अंधेरी येथून 12 , विदेश डाक कार्यालय , बल्लार्ड इस्टेट मुंबई येथून 26 आणि मुंबईतील एअर पार्सल सॉर्टिंग ऑफिस, विलेपार्ले (पू ), इथून 5 कन्साईनमेंट ताब्यात घेतल्या. एकूण 1470 आय.फोन, 322 ऍपल घड्याळे, 64 ड्रोन्स, 41 एअर पॉड्स , 1 391 सिगारेट स्लीव्ह आणि 36 ऑटो पार्ट्स यांचा समावेश आहे , ज्यांचे अंदाजे स्थानिक बाजार मूल्य 15 कोटी रुपये आहे.
या वस्तूवर लागू होणारे सीमाशुल्क आणि आयजीएसटी कर टाळण्यासाठी वस्तूंची माहिती मूल्य आणि प्रमाण याबाबत चुकीची माहिती देऊन टपालाद्वारे या वस्तू तस्करीमुक्त करण्याचा प्रयत्न केला गेला. तपासा दरम्यान, वरील कन्साईन्मेंटची नावे व पत्ते बनावट / डमी असल्याचे आढळले.
अधिक तपास सुरू आहे.
स्रोत: सीमाशुल्क विभाग--III, मुंबई
Jaydevi PS/S.Kane/P.Kor
(Release ID: 1700213)
Visitor Counter : 211