भारतीय स्पर्धा आयोग
सीसीआयने पीजीपी ग्लास प्रायव्हेट लिमिटेडद्वारा विविध अधिग्रहण प्रस्तावांना दिली मंजुरी
Posted On:
23 FEB 2021 1:18PM by PIB Mumbai
भारतीय स्पर्धा आयोगाने स्पर्धा कायदा 2002 च्या कलम 31 (1) अन्वये पीजीपी ग्लास प्रायव्हेट लिमिटेड (अधिग्रहणकर्ता) द्वारा पिरामल ग्लास प्रायव्हेट लिमिटेड (पीजीपीएल) चा ग्लास पॅकेजिंग आणि काचेच्या सजावटीच्या निर्मिती आणि /विक्री व्यवसाय; (ii) पीजीपीएलच्या ग्लास पॅकेजिंग आणि काचेच्या सजावटीच्या सामुग्रीची निर्मिती आणि/किंवा विक्रीच्या व्यवसायात सहभागी त्याच्या विशिष्ट सहाय्यक कंपन्यांमध्ये समभाग; (iii) विव्हिड ग्लास ट्रेडिंग एफझेडसीओ (विव्हिड ट्रेडिंग) चे काही समभाग; आणि (iv) अन्सॅपॅक प्रायव्हेट लिमिटेड (अन्सॅपॅक) चे काही व्यवसाय विभाग अधिग्रहित करायला मंजुरी दिली आहे.
प्रस्तावित एकत्रिकरणाच्या उद्देशाने अधिग्रहणकर्त्याची स्थापना करण्यात आली आहे. हे बीसीपी टॉपको व्ही प्रा लि शी संलग्न आहे. जी ब्लॅकस्टोनच्या संलग्न कंपन्यांद्वारे सल्ला आणि/किंवा निधी व्यवस्थापनाशी संलग्न आहे.
पीजीपीएल ही एक खासगी लिमिटेड कंपनी आहे जी भारतीय कायद्यांतर्गत स्थापन केली आहे आणि ग्लास पॅकेजिंग आणि काचेच्या सजावट वस्तू, सौंदर्यप्रसाधने, परफ्युम, स्पेशलिटी फूड अँड बेवरेज आणि फार्मास्युटिकल उद्योगांचे उत्पादन आणि विक्री या व्यवसायात आहे. पीजीपीएल अजय पिरामल आणि कुटुंबाच्या मालकीची आहे आणि औषध निर्मिती, वित्तीय सेवा, स्थावर उद्योग आणि काचेच्या पॅकेजिंग क्षेत्राशी संबंधित पीरामल समूहाची आहे.
S.Tupe/S.Kane/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1700132)
Visitor Counter : 185