भारतीय स्पर्धा आयोग

सीसीआयने सीडीपीक्यू प्रायव्हेट इक्विटी एशिया प्रा लि द्वारा एपीआय होल्डिंग्ज प्रायव्हेट लिमिटेडच्या समभाग खरेदीला मंजुरी दिली

Posted On: 23 FEB 2021 12:49PM by PIB Mumbai

 

भारतीय स्पर्धा आयोगाने स्पर्धा कायदा 2002 च्या कलम 31(1) अन्वये सीडीपीक्यू प्रायव्हेट इक्विटी एशिया प्रा लि द्वारा एपीआय होल्डिंग्ज प्रायव्हेट लिमिटेडच्या समभाग खरेदीला आज मंजुरी दिली आहे.

यामध्ये काही अतिरिक्त अधिकारांसह अधिग्रहणकर्त्याने लक्ष्यित अंदाजे 2% समभाग संपादित करणे अपेक्षित आहे.

अधिग्रहणकर्ता सीडीपीक्यूची संपूर्ण मालकीची उपकंपनी आहे आणि सिंगापूरमध्ये स्थित आहे. सीडीपीक्यू एक संस्थात्मक गुंतवणूकदार म्हणून काम करते जे प्रामुख्याने सार्वजनिक आणि निमसरकारी निवृत्तीवेतन आणि विमा योजनांसाठी निधी व्यवस्थापन करते. सीडीपीक्यू हा कॅनेडियन संस्थात्मक निधी आहे, जो क्यूबेकमधील सार्वजनिक आणि खाजगी निवृत्तीवेतन आणि विमा निधीचा समावेश असलेल्या 40 हून अधिक ठेवीदारांचे व्यवस्थापन व सेवा पुरवतो.

एपीआय होल्डिंग्ज ही भारतात सुरु केलेली  कंपनी आहे आणि ती एपीआय होल्डिंग समूहाची मुख्य संस्था आहे. थेट किंवा त्याच्या सहाय्यक कंपन्यांद्वारे एपीआय होल्डिंग विविध व्यवसाय करते

 

S.Tupe/S.Kane/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1700128) Visitor Counter : 144


Read this release in: Telugu , English , Urdu , Hindi , Tamil