संरक्षण मंत्रालय
भारत-चीन कोअर कमांडर स्तरावरील बैठकीची दहावी फेरी
Posted On:
21 FEB 2021 7:45PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 21 फेब्रुवारी 2021
भारत-चीन कोअर कमांडर स्तरावरील बैठकीची दहावी फेरी आज, 20 फेब्रुवारीला पार पडली. पँगाँग सरोवर परिसरातील आघाडीवरच्या सैन्याच्या तुकड्या सुरळीतपणे मागे घेतल्याची दोन्ही बाजूंनी एकमेकांना माहिती दिली. पश्चिम भागातील वास्तविक नियंत्रण रेषेच्या संदर्भातील इतर प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी चांगले वातावरण तयार करण्याच्या दृष्टीने ही नोंद घेण्याजोगी बाब असल्याचे यावेळी नमूद करण्यात आले. वास्तविक नियंत्रण रेषेच्या संदर्भात दोन्ही पक्षांच्या सखोल दृष्टिकोनाची यावेळी देवाणघेवाण करण्यात आली. दोन्ही पक्षांनी त्यांच्या राष्ट्रीय नेत्यांच्या सहमतीचे महत्व मान्य करत संवाद आणि चर्चा सुरू ठेवणे तसेच प्रत्यक्ष स्थानावरील स्थिती नियंत्रणात ठेवणे यावर एकमत केले. दोन्ही पक्षांना स्वीकारार्ह असणाऱ्या तोडग्यासाठी इतर प्रश्नांवर स्थिर आणि सुनियोजित पद्धतीने पुढे जाणे आवश्यक असल्याचे आणि त्यासाठी सीमा भागात शांतता आणि सुव्यवस्था राखणे गरजेचे असल्याचे दोन्ही पक्षांनी मान्य केले.
M.Chopade/V.Sahjrao/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1699812)
Visitor Counter : 274