श्रम आणि रोजगार मंत्रालय

वेतनपट डेटा :   डिसेंबर 2020 मध्ये ईपीएफओ अर्थात कर्मचारी भविष्य निर्वाह संघटना मध्ये 12.54 लाख निव्वळ ग्राहकांची भर

Posted On: 20 FEB 2021 8:18PM by PIB Mumbai

 

ईपीएफओने 20 फेब्रुवारी 2021 ला प्रकाशित केलेल्या तात्पुरत्या वेतन आकडेवारीनुसार, डिसेंबर 2020 मध्ये  12.54 लाख ग्राहकांची भर पडल्यामुळे निव्वळ ग्राहक आधारित वाढीचा सकारात्मक कल अधोरेखीत झाला. मागील महिन्याच्या म्हणजेच नोव्हेंबर 2020 च्या तुलनेत  निव्वळ ग्राहकांची 44 % वाढ दिसून आली.

वर्षाच्या तुलनेत , डिसेंबर 2020 मध्ये झालेली वाढ ईपीएफओच्या ग्राहक वाढीचा कोविड पूर्व स्तरावरील परतावा दर्शविते.

कोविड -19  महामारी असतानाही, चालू आर्थिक वर्षाच्या  पहिल्या तिमाहीत ईपीएफओशी सुमारे 53.70 लाख ग्राहक जोडले गेले.चालू आर्थिक वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीत दुसऱ्या तिमाहीच्या तुलनेत निव्वळ वेतनपटाची 22 टक्के इतकी जोरदार वाढ नोंदविण्यात आली.

कोविड- 19 महामारीदरम्यान भारत सरकारने, एबीआरवाय, पीएमजीकेवाय आणि पीएमआरपीवाय योजनांच्या माध्यमातून अर्थव्यवस्थेचे औपचारिकीकरण करण्याच्या  धोरण समर्थनार्थ ईपीएफओने सुलभ आणि अखंडित सेवा सुविधेसाठी, अलीकडेच केलेल्या ई- उपाययोजनांना, ईपीएफओमधल्या वेतनपट वाढीचा कल आणि ग्राहकाधारीत  गतिमान सदस्यता विस्तार याचे श्रेय अंशतः श्रेय दिले जाऊ शकते.

डिसेंबर 2020 मध्ये, ईपीएफओच्या कक्षेअंतर्गत सुमारे 8.04 लाख नवे सदस्य आले. अंदाजे, 4.5 लाख सदस्य बाहेर पडले आणि ते  ईपीएफओमध्ये पुन्हा सहभागी झाले, हे असे दर्शविते कीईपीएफओच्या कक्षेत येणाऱ्या आस्थापनांमधून ग्राहकांनी नोकरी बदलली आणि अंतिम तडजोडीचा पर्याय नं निवडता निधी हस्तांतरित करून सदस्यत्व कायम ठेवले. भारतात कोविड - 19 रुग्णांची सक्रिय संख्या कमी झाल्यामुळे कर्मचारी आपल्या  नोकऱ्यांच्या ठिकाणी परतत आहेत, हे सदस्य संख्या वाढते आहे याचे  दर्शक आहे. पुढे, ईपीएफओने सुरू केलेल्या ऑटो - ट्रान्सफर सुविधेमुळे, अनेक प्रकरणांमध्ये नोकरी बदलल्यानंतर  जुन्या खात्यातून नवीन खात्यात पीएफ शिल्लक विना अडथळा हस्तांतरित करणे शक्य झाले आहे.

वयानुसार केलेल्या विश्लेषणावरून असे दिसून येते की, डिसेंबर 2020 दरम्यान 22 ते 25 वयोगटातील ग्राहकाधारित सुमारे  3.36 लाख  निव्वळ सदस्य  नोंदणीची भरीव वाढ नोंदविण्यात आली.त्यानंतर 18 ते 21 वयोगटातील सुमारे 2.81 लाख निव्वळ सदस्य नोंदणी झाली. निर्णय स्वातंत्र्याच्या दृष्टीने  महत्वाचा टप्पा, शैक्षणिक ज्ञानाचा वापर, सामाजिक आणि आर्थिक उत्पादकता यासोबतच व्यक्तीच्या प्रत्यक्ष  मिळकत क्षमतेचा स्तर, हा वयोगट दर्शवितो.आकडेवारीनुसार, डिसेंबर 2020 मध्ये एकूण ग्राहकवाढीत ,18 ते 25 वयोगटाने  सुमारे 49.19 % योगदान दिले.

राज्यांमधल्या वेतन आकडेवारीच्या तुलनेत असे दिसून आले आहे की, महाराष्ट्र , गुजरात, हरयाणा, तामिळनाडू आणि कर्नाटक ही राज्ये रोजगार निर्मितीत  आघाडीवर असून यामुळे चालू आर्थिक वर्षात सर्व वयोगटातील एकूण 53.70 लाख निव्वळ ग्राहकांपैकी 29.12 लाख ग्राहकांची भर पडली

उद्योगनिहाय विश्लेषण असे सूचित करते की,' तज्ञ सेवा ' श्रेणी ( ज्यामध्ये प्रामुख्याने मनुष्यबळ संस्था, खाजगी सुरक्षा संस्था आणि छोटे कंत्राटदार समाविष्ट आहेत) उत्कृष्ट कामगिरी करीत आहेत. उद्योग श्रेणीत पहिल्या दहा उद्योगातील 46.26 लाख निव्वळ वेतनपट वाढीपैकी तज्ञ सेवा प्रवर्गाने, एप्रिल ते डिसेंबर 2020 मध्ये सर्व वयोगटातील 26.94 लाख निव्वळ ग्राहक योगदान दिले.

डिसेंबर 2020 मधील वेतनपट आकडेवारीचे लिंग -निहाय  विश्लेषण दर्शवते की, महिला नोंदणीचा हिस्सा सुमारे 22.76% आहे.2020 च्या डिसेंबर महिन्यात  एकूण 8.04 लाख निव्वळ ग्राहक ईपीएफ योजनेत सहभागी झाले त्यात एकूण 1.83 लाख महिला होत्या.

नोकऱ्यांमध्ये महिलांच्या नोंदणीत सुधारणा होत आहे, नोव्हेंबर 2020 मध्ये महिला ग्राहकांची संख्या 1.52 लाख होती.

एप्रिल 2018 पासून ईपीएफओ सप्टेंबर 2017 पासूनचा वेतनाचा डेटा जाहीर करीत आहे . निर्गमित झालेल्या सदस्यांची माहिती , व्यक्ती / आस्थापनांनी सादर केलेल्या दाव्यांवर आणि कर्मचाऱ्यांनी अपलोड केलेल्या निर्गमन माहितीवर आधारित असते .तर नवीन सदस्यांची संख्या यंत्रणेमध्ये निर्माण केलेल्या  युनिव्हर्सल अकाउंट नंबर (यूएएन) वर आधारित असते आणि त्यांना शून्येतर सदस्यता मिळाली आहे. वेतनपट डेटा  हा तात्पुरता आहे कारण डेटा तयार करणे आणि कर्मचार्‍यांच्या नोंदी अद्यतनित करणे ही एक सततचालणारी  प्रक्रिया आहे.

***

Jaydevi PS/S.Chavhan/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1699706) Visitor Counter : 129


Read this release in: Tamil , English , Urdu , Hindi , Telugu