उपराष्ट्रपती कार्यालय

निरोगी जीवनशैली आणि चांगल्या खाण्याच्या सवयींना प्रोत्साहन देण्यासाठी मोठ्या प्रमाणात राष्ट्रीय मोहिमेचे उपराष्ट्रपतींचे आवाहन


हैद्राबादमधील डीएनए फिंगरप्रिंटिंग अँड डायग्नोस्टिक केंद्राला उपराष्ट्रपतींची भेट

पेडिएट्रिक रेअर जेनेटिक डिसऑर्डर्स लॅबोरेटरीचे उपराष्ट्रपतींच्या हस्ते उद्घाटन

Posted On: 20 FEB 2021 4:47PM by PIB Mumbai

 

देशात वाढत असलेल्या असंसर्गजन्य रोगांचे प्रमाण पाहता, निरोगी जीवनशैली अंगिकारणे आणि बैठ्या पद्धतीने कामाची सवय आणि जंक फूड टाळण्याचे आवाहन उपराष्ट्रपती एम. वैंकय्या नायडू यांनी नागरिकांना, प्राधान्याने युवकांना आज केले.

हैद्राबाद येथील डीएनए फिंगरप्रिंटिंग अँड डायग्नोस्टिक्स केंद्राला भेट दिल्यानंतर तेथील शास्त्रज्ञांना संबोधित करताना ते बोलत होते. ते म्हणाले की, काही वर्षांपूर्वी जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) दिलेल्या आकडेवारीनुसार, भारतात होणाऱ्या एकूण मृत्यूंपैकी 61 टक्के मृत्यू हे हृदयविकार, कर्करोग आणि मधुमेह यासारखे असंसर्गजन्य रोगांमुळे होणारे आहेत, असे दर्शविले होते.

नायडू यांनी निरोगी जीवनशैली आणि खाण्याच्या योग्य सवयींचा अवलंब करण्याच्या महत्त्वांवर व्यापक मोहीम राबवण्याचे आवाहन केले. या संदर्भात, नागरिकांनी आरोग्यदायी जीवनशैलीची निवड करावी, यासाठी लोकांमध्ये जनजागृती करण्याचे आवाहन त्यांनी शास्त्रज्ञांना केले.

बैठ्या पद्धतीने काम करण्याची जीवनशैली आणि खानपानाच्या अयोग्य सवयींचा नकारात्मक परिणाम याबाबत, लोकांमध्ये जनजागृती निर्माण करण्यासाठी, विशेषतः शाळा आणि महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांना सांगण्यासाठी, एकत्रित प्रयत्न केले पाहिजेत, असे आवाहन त्यांनी केले. सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी, आपल्या पारंपरिक जेवणाची सवय पुन्हा आपण अंगिकारली पाहिजे आणि आरोग्यासाठी चांगल्या परिणामासाठी प्रथिने, समृद्ध आणि संपन्न अन्न वापरास प्रोत्साहन दिले पाहिजे, यावर उपराष्ट्रपतींनी भर दिला. झटपट अन्नाच्या फॅडविरुद्ध सावधगिरी बाळगताना त्यांनी म्हटले की, "इन्स्टन्ट फूट (झटपट मिळणार पदार्थ) म्हणजे सातत्याने होणारे आजार."

या भेटी दरम्यान, उपराष्ट्रपतींनी सीडीएफजी येथे 'पेडिएट्रिक रेअर जेनेटीक डिसऑर्डर्स लॅबोरेटरीचे' देखील उद्घाटन केले.

***

S.Tupe/S.Shaikh/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1699653) Visitor Counter : 218