श्रम आणि रोजगार मंत्रालय
कृषी आणि ग्रामीण मजूरांसाठीचा अखिल भारतीय ग्राहक मूल्य निर्देशांक –जानेवारी 2021
Posted On:
19 FEB 2021 6:25PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 19 फेब्रुवारी 2021
जानेवारी महिन्यासाठीचा, कृषी तसेच ग्रामीण मजूरांसाठीचा अखिल भारतीय ग्राहक मूल्य निर्देशांक अनुक्रमे 9 आणि 8 अंकांनी खाली घसरला असून कृषी मजुरांसाठीचा निर्देशांक 1038 तर ग्रामीण मजुरांसाठीचा निर्देशांक 1045 इतका झाला आहे. डाळी, कांदा, बटाटा, कोबी, वांगी अशा भाजीपाला आणि अन्नधान्याच्या किमती घसरल्यामुळे त्यावर आधारित अन्नधान्य निर्देशांकात शेतमजुरांसाठी 12.52 तर ग्रामीण मजूरांसाठी 11.40 अंकांपर्यंत घसरण झाली आहे.
विविध राज्यांमध्ये निर्देशांकात झालेली वाढ/घट वेगवेगळी आहे.
या निर्देशांकाविषयी बोलतांना श्रम आणि रोजगार मंत्री संतोष कुमार गंगवार म्हणाले, “की ग्राहकांच्या खरेदीक्षमतेवर आधारलेल्या सीपीआय-एएल आणि आर एल निर्देशांकात अनुक्रमे 2.17% आणि 2.35% पर्यंत झालेली घट अन्नधान्य आणि भाज्यांच्या किमती कमी झाल्यामुळे झाली आहे.
All-India Consumer Price Index Number (General & Group-wise)
Group
|
Agricultural Labourers
|
Rural Labourers
|
|
Dec,2020
|
Jan,2021
|
Dec,2020
|
Jan,2021
|
General Index
|
1047
|
1038
|
1053
|
1045
|
Food
|
1005
|
987
|
1010
|
993
|
Pan, Supari, etc.
|
1738
|
1762
|
1749
|
1773
|
Fuel & Light
|
1099
|
1110
|
1094
|
1104
|
Clothing, Bedding &Footwear
|
1025
|
1031
|
1045
|
1050
|
Miscellaneous
|
1068
|
1076
|
1071
|
1080
|
हा निर्देशांक जाहीर करतांना कामगार विभागाचे महासंचालक डीपीएस नेगी म्हणाले की ‘महागाई दरात झालेली ही घसरण ग्रामीण भागात काम करणाऱ्या लाखो मजुरांना मोठा दिलासा देणारी आहे.”
फेब्रुवारी महिन्यासाठीच्या ग्राहक मूल्य निर्देशांकाची आकडेवारी 19 मार्च रोजी जाहीर केली जाईल.
* * *
M.Chopade/R.Aghor/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1699454)
Visitor Counter : 227