गृह मंत्रालय

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी कोलकाता येथील भारत सेवा आश्रम संघात प्रणवानंदजी यांना आदरांजली वाहिली आणि गुरुंचा आशीर्वाद घेतला

प्रविष्टि तिथि: 18 FEB 2021 9:20PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 18 फेब्रुवारी 2021

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज कोलकाता येथील भारत सेवा आश्रम संघात जाऊन प्रणवानंदजी यांना आदरांजली वाहिली आणि गुरुंचा आशीर्वाद घेतला. आजचा दिवस खूप महत्वाचा आहे कारण आज आचार्य रामकृष्ण परमहंस आणि चैतन्य महाप्रभु यांचा वाढदिवस आहे असे अमित शहा यावेळी म्हणाले. युगाचार्य प्रणवानंदजींनी ज्या ठिकाणी आपल्या आयुष्यातील प्रदीर्घ काळ घालवला त्या ठिकाणी येण्याचे मला सौभाग्य मिळाले. देशाला जेव्हा सर्वात जास्त आवश्यकता होती अशा वेळी युगाचार्य प्रणवानंदजी यांनी स्वधर्म आणि स्वराज याची कल्पना मांडली. शाह म्हणाले की फाळणी नंतरही हे क्षेत्र भारताशी जोडलेले राहिले. त्यावेळी प्रणवानंद जी यांनी डॉ.श्यामा प्रसाद मुखर्जी यांना प्रेरित केले. प्रणवानंद भारत सेवाश्रम संघाने तरुणांमध्ये देशभक्ती, धार्मिक जाणीव, आत्मविश्वास, सेवा, समर्पण आणि त्याग या गुणांचा विकास करण्यासाठी देशव्यापी मोहीम राबविली आणि 105 वर्षांपूर्वी पेरलेल्या या बीजाचा आज वटवृक्ष झाला आहे. येथील सेवादारांनी धर्म आणि जातीपलीकडे जाऊन लोकांची सेवा केली आहे.

M.Chopade/S.Mhatre/P.Malandkar

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(रिलीज़ आईडी: 1699207) आगंतुक पटल : 173
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Bengali , Gujarati