संरक्षण मंत्रालय
आत्मनिर्भर भारत अभियानाअंतर्गत भारतीय लष्करासाठी सॉफ्टवेअर डिफाईंड रेडिओ (एसडीआर)
Posted On:
18 FEB 2021 9:16PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 18 फेब्रुवारी 2021
- सर्व लष्करी मोहिमांसाठी संवाद आवश्यक आणि निर्णायक आहे. युद्धभूमीवर भारतीय लष्करासाठी कॉम्बॅट नेट रेडिओ (सीएनआर) संवादासाठीचा मुख्य आधार आहे .भारतीय लष्करातील समकालीन सीएनआर उपकरणे केवळ आवाजाद्वारे संवादाला मदत करतात आणि त्यात मर्यादित क्षमता आहे किंवा कोणतीही माहिती प्रसारण क्षमता नाही . तंत्रज्ञानाबरोबर आलेल्या फायद्यांसह नेटवर्क केंद्रित युद्धभूमीवर जवानांना युद्धासाठी सुसज्ज करण्यासाठी सध्याचे रेडिओ लवकरच बदलून त्याजागी स्वदेशी बनावटीचे सॉफ्टवेअर डिफाइण्ड रेडिओ ( एसडीआर) आणले जातील. ज्यामध्ये आहे, अधिक माहिती प्रसारण क्षमता आणि आवाजाची स्पष्टता आणि अत्यंत गोंगाट असलेल्या वातावरणात माहिती प्रसारण अचूकता , बहु लहरींचा आधार ,भारतीय लष्करी मोहिमेच्या आवश्यकता पूर्ण करण्यासाठी मोठी यंत्रणा सुरक्षा तसेच स्पष्ट आणि सुरक्षित उत्तम संवाद क्षमता.
- मेक - II श्रेणी अंतर्गत अति / अल्ट्रा उच्च लहरी (व्ही / यूएचएफ) मॅनपॅक एसडीआर खरेदी करून भारतीय लष्कराचे संवाद यंत्रणेत सुधारणा करण्याचे काम सुरू आहे. विक्रेत्यांच्या प्रतिसादाचे यशस्वी मूल्यांकन झाल्यानंतर,प्रकल्प मंजुरी आदेश (पीएसओ) 18 भारतीय विक्रेत्यांना देण्यात आले आहेत . डीएपी 2020 (संरक्षण संपादन प्रक्रिया) च्या (भारतीय-आयडीडीएम) खरेदी श्रेणीतील तरतुदीनुसार , उत्पादन यशस्वी विकसित करणाऱ्या कंपनीला कंत्राट दिले जाईल.
- मेक -II अंतर्गत विकसित केलेला व्ही / यूएचएफ मॅनपॅक एसडीआर भारतीय लष्करासाठी गेमचेंजर ठरेल. हे सरकारच्या "आत्मनिर्भर भारत" धोरणाशी सुसंगत आहे.ज्यामुळे विकसित संवाद प्रणालीमध्ये 'आत्मनिर्भरता' येईल.
M.Chopade/S.Chavan/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1699204)
Visitor Counter : 244