खाण मंत्रालय
डिसेंबर 2020 दरम्यान खनिज उत्पादन (तात्पुरते)
Posted On:
18 FEB 2021 4:46PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 18 फेब्रुवारी 2021
डिसेंबर, 2020 मधील खाणकाम आणि उत्खनन क्षेत्रातील खनिज उत्पादन निर्देशांक ( आधार वर्ष : 2011-12=100) 115.1 होता. जो, डिसेंबर, 2019 च्या तुलनेत 4.8% कमी होता. गेल्या वर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत एप्रिल - डिसेंबर 2020-21 या काळात संचयी वृद्धी (-) 11.3 टक्के नोंदवण्यात आली.
डिसेंबर 2020 मध्ये महत्वाच्या खनिज उत्पादनाचा स्तर याप्रमाणे :
कोळसा 711 लाख टन्स, लिग्नाइट 32 लाख टन, नैसर्गिक वायू (वापरलेले) 2355 दशलक्ष घनमीटर, पेट्रोलियम ( कच्चे ) 26 लाख टन, बॉक्साइट 1963 हजार टन, क्रोमाइट 236 हजार टन, तांबे घन 7 हजार टन, सोने 61 किग्रॅ. , लोहखनिज 209 लाख टन, शिसे घन 34 हजार टन, मँगनीज धातू 275 हजार टन, झिंक घन 131 हजार टन, चुनखडी 333 लाख टन, फॉस्फोराइट 133 हजार टन, मॅग्नेसाइट 6 हजार टन आणि हिरे 2901 कॅरेट.
डिसेंबर 2020 मध्ये, डिसेंबर 2019 च्या तुलनेत सकारात्मक वृद्धी दिसून आली :
'चुनखडी' (10.1%), 'झिंक घन' (8.6%), 'शिसे घन (3.4%) आणि कोळसा (2.1%). नकारात्मक वृद्धी दर्शवणारी महत्वाची खनिजे याप्रमाणे:
सोने [(-) 55.5%], क्रोमाईट [(-) 37.8%], तांबे घन [(-) 37.6%], लिग्नाइट [(-) 18.9%], फॉस्फोराइट [(-) 16.3%], मँगनीज धातू (-) 13.8%], लोहखनिज [(-) 12.0%], नैसर्गिक वायू (वापरलेले) [(-) 7.2%], बॉक्साइट [(-) 7.0%], आणि पेट्रोलियम (कच्चे) (-) 3.6%].
S.Tupe/S.Chavan/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1699071)
Visitor Counter : 216