रेल्वे मंत्रालय

श्री. पियुष गोयल यांनी मौ-आनंदविहार द्विसाप्ताहीक विशेष गाडीला दाखविला  व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे हिरवा झेंडा

Posted On: 14 FEB 2021 10:17PM by PIB Mumbai

 

केंद्रीय रेल्वे, वाणिज्य आणि उद्योग, ग्राहक व्यवहार, अन्नसार्वजनिक वितरण व्यवस्था श्री. पियुष गोयल यांनी मौ-आनंदविहार या द्विसाप्ताहीक विशेष गाडीला, इतर मान्यवरांच्या उपस्थितीत  व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे  हिरवा झेंडा दाखविला.

यावेळी बोलताना  मंत्री श्री. पियुष गोयल म्हणाले,"मौ आणि आनंदविहार यांना जोडणारी ही गाडी पूर्वांचलमधील जनतेची प्रलंबित मागणी पूर्ण करत आहे. ही नवीन गाडी या प्रदेशातील आर्थिक व्यवस्थेला चालना देईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली उत्तर प्रदेशातील रेल्वे प्रकल्पांसाठी 2009 ते 2014 या कालावधीच्या तुलनेत अर्थसंकल्पात 10 पट निधी वाढविला आहे. हे उत्तरप्रदेशातील पायाभूत सुविधांच्या विकासासाठी असलेल्या वचनबद्धतेचे दर्शन घडविते.

ही गाडी मौ आणि  राष्ट्रीय राजधानी यांना  जोडत पूर्वांचल भागात सामाजिक आर्थिक विकास घडवून आणेल. या भागातील स्थानिक उद्योगांना या सुधारलेल्या जोडणीमुळे चालना मिळेल.

***

M.Chopade/S.Patgoankar/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1698006) Visitor Counter : 144