रेल्वे मंत्रालय

कोविडनंतर पहिल्यांदाच रेल्वे मालवाहतुकीचा महसूल गेल्या वर्षीच्या याच कालावधीतील महसूलापेक्षा अधिक


या वर्षात रेल्वे मालवाहतुकीचा एकत्रित महसूल 98068.45 कोटींपर्यंत पोहोचला; गेल्या वर्षी याच काळात हा महसूल 97342.14 कोटी रुपये इतका होता.

महिन्यांच्या तुलनेत मालवाहतूक महसूल गेल्यावर्षीच्या फेब्रुवारी महिन्याच्या तुलनेत 5% टक्क्यांपेक्षा अधिक

रेल्वेचे नवनवे विक्रमी टप्पे ओलांडण्याचे सत्र सुरूच

प्रविष्टि तिथि: 13 FEB 2021 8:44PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 13 फेब्रुवारी 2021

 

कोविडनंतरच्या काळात पहिल्यांदाच भारतीय रेल्वेच्या एकूण मालवाहतूक महसुलात गेल्या वर्षीच्या तुलनेत वाढ झाली असून तो 98068.45 कोटी रुपये झाला आहे. गेल्या वर्षी याच काळात हा महसूल 97342.14 कोटी रुपये इतका होता.

महिन्यांच्या महसुलाची तुलना करायची झाल्यास, फेब्रुवारीच्या पहिल्या 12 दिवसांतच रेल्वे मालवाहतूक महसुलात गेल्या वर्षी फेब्रुवारीच्या तुलनेत 5% टक्क्यांची वाढ झाली आहे.  

फेब्रुवारी 2021 मध्ये, गेल्या वर्षीच्या फेब्रुवारीच्या तुलनेत,  रेल्वेच्या महसुलात 206 कोटी रुपयांची वाढ झाली आहे.

एका अंदाजानुसार, फेब्रुवारीच्या पहिल्या 12 दिवसांत रेल्वे मालवातुकीचा महसूल 4571कोटी रुपयांपर्यंत पोचला आहे. गेल्या वर्षी याच काळात तो 4365 कोटी रुपये इतका होता. मालाच्या वाहतुकीतही गेल्या वर्षीच्या तुलनेत 8 टक्क्यांची वाढ झाली आहे.

रेल्वेने व्यावसायिक विकास, विविध प्रोत्साहन आणि सवलती, वेग आणि लोकांच्या अपेक्षेनुरूप वैयक्तिक सोयी-सुविधा देण्यासाठी केलेल्या विशेष प्रयत्नांमुळे ही महसूल वाढ साध्य केली आहे.

रेल्वेच्या मालवाहतुकीत, आधीच्या आर्थिक वर्षाच्या तुलनेत, ऑगस्ट 2020 पासूनच वाढ होत आहे. मात्र कोविड टाळेबंदीनंतर पहिल्यांदाच या महिन्याच्या महसूलाने गेल्या वर्षीच्या तुलनेत वाढ नोंदवली आहे.

मालवाहतुकीत होणारी वाढ, ही देशाच्या एकूण अर्थव्यवस्थेत होत असलेल्या सुधारणेचे निदर्शक आहे. त्याचवेळी, रेल्वेने व्यवसायांना चालना देण्यासाठी आणि मालवाहतुकीत सुधारणा करण्यासाठी केलेल्या उपाययोजनांचे हे फलित आहे.


* * *

S.Patil/R.Aghor/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(रिलीज़ आईडी: 1697810) आगंतुक पटल : 284
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Tamil