विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय
विज्ञान आणि अभियांत्रिकी संशोधन मंडळ (एसईआरबी) ने आंतरराष्ट्रीय महिला आणि कन्या दिवसानिमित्त विज्ञानातील उत्कृष्टता पुरस्कार 2021 केले जाहीर
Posted On:
13 FEB 2021 2:40PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 13 फेब्रुवारी 2021
राष्ट्रीय विज्ञान अकादमीच्या चार युवा महिला प्रशिक्षणार्थींना 2021 साठी विज्ञान आणि अभियांत्रिकी क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल आंतरराष्ट्रीय महिला आणि कन्या दिवसानिमित्त गौरविण्यात आले आहे.
एसईआरबी महिला उत्कृष्टता पुरस्कार म्हणून तीन वर्षांच्या कालावधीसाठी संशोधन संकल्पनेचा अभ्यास आणि पाठपुरावा करण्यासाठी 15 लाख रुपयांचे अनुदान हे संबंधित पुरस्कार्थींना प्रदान केले जाते .
विज्ञान आणि अभियांत्रिकी संशोधन महामंडळ (एसईआरबी) यांच्या वतीने हा पुरस्कार दिला जातो, विज्ञान आणि अभियांत्रिकीच्या क्षेत्रात मूलभूत संशोधनास पाठिंबा देणारी विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाची (डीएसटी) एक वैधानिक संस्था आहे, जिचा प्रारंभ 2013 मध्ये झाला आहे. हा पुरस्कार 40 वर्षांखालील महिला वैज्ञानिकांना देण्यात येतो , ज्यांना एक किंवा त्यापेक्षा अधिक राष्ट्रीय संस्थांच्या वतीने युवा शास्त्रज्ञ पुरस्कार, युवा सहयोगीता पुरस्कार मिळाले असतील, अशांना हा पुरस्कार देण्यात येतो.
पुरस्कारासाठी निवडल्या गेलेल्या महिला शास्त्रज्ञांमध्ये ,भारतीय अभियांत्रिकी संस्था (आयआयटी), मुंबई,इथे या रासायनिक जीवशास्त्र क्षेत्रात काम करनाऱ्या सहायक प्राध्यापक डॉ. शोभा कपूर यांचा समावेश असून त्या `होस्ट – पॅथोजेन इंटरॅक्शन्स अँड मेम्ब्रेन बायोलॉजी, केमिकल बायोलॉजी अँड बायोफिजिक्स` विषयातील त्या तज्ज्ञ आहेत.
डॉ. अंतरा बॅनर्जी, शास्त्रज्ञ, बी नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर रिसर्च इन रिप्रॉडक्टिव्ह हेल्थ, मुंबई, महाराष्ट्र, या आरोग्य शास्त्र क्षेत्रात कार्यरत आहेत. त्या सिग्नल ट्रान्सडक्शन, बायोलॉजी ऑफ रिप्रॉडक्शन अँड इनडोक्रिनॉलॉजी विषयातील तज्ज्ञ आहेत.
डॉ. सोनू गांधी, शास्त्रज्ञ डी, या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ अनिमल बायोटेक्नॉलॉजी, हैद्राबाद इथे कार्यरत असून त्या बायोनॅनोटेक्नॉलॉजी क्षेत्राशी संबंधित आहेत आणि नॅनोसेन्सर्स डिझाइन अँड फॅब्रिकेशन ऑफ लेबल फ्री बायोसेन्सर्स हे त्यांचे मध्यवर्ती विषय आहेत.
डॉ. रितू गुप्ता, सहाय्यक प्राध्यापक, भारतीय अभियांत्रिकी संस्था (आयआयटी), जोधपूर, राजस्थान, या नॅनोटेक्नॉलॉजी क्षेत्रात कार्यरत आहेत आणि मटेरिअल सायन्स, नॅनोडिव्हायेस अँड सेन्सर्स, हेल्थ अँड एनर्जी यामध्ये त्या तज्ज्ञ आहेत.
दरवर्षी www.serbonline.in. या माध्यमातून पुरस्कारांसाठी आवाहन केले जाते.
* * *
Jaydevi PS/S.Shaikh/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1697710)
Visitor Counter : 215