कौशल्य विकास आणि उद्यमशीलता मंत्रालय
आखाती देशातून परतलेल्या भारतीयांना सहाय्य
Posted On:
12 FEB 2021 6:50PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 12 फेब्रुवारी 2021
वंदे भारत अभियानाअंतर्गत परतलेल्या नागरिकांच्या कौशल्यविषयक मॅपिंगसाठी केंद्र सरकारने ‘स्वदेस’, हा कुशल कामगारांच्या आगमनाबाबतचा रोजगार सहाय्यासाठी डेटाबेस पुरवणारा उपक्रम सुरु केला आहे.स्वदेस हा कौशल्य विकास आणि उद्योजकता, नागरी हवाई वाहतूक आणि परराष्ट्र व्यवहार या मंत्रालयांचा संयुक्त उपक्रम आहे. देशात परतणाऱ्या नागरिकांच्या कौशल्य आणि अनुभवावर आधारीत व्यापक माहिती देणारा डेटाबेस तयार करणे हा यामागचा उद्देश आहे. परतणाऱ्या नागरिकांनी,रोजगार, रोजगार अनुभवाची वर्षे यासारखी रोजगार विषयीची माहिती असणारे ऑनलाईन स्वदेस कौशल्य कार्ड भरायचे आहे. 25 जानेवारी 2021 पर्यंत 30,500 पेक्षा जास्त नागरिकांनी स्वदेस कौशल्य कार्डासाठी नोंदणी केली असून यापैकी 24,500 हून अधिक जण संयुक्त अरब अमिरात, सौदी अरेबिया,ओमान,कतार,कुवेत आणि बहारीन या आखाती सहकार्य परिषद सदस्य देशांमधून परतले आहेत.
स्वदेस नोंदणीचे तपशील स्कील इंडिया असीम (आत्मनिर्भर स्कील एम्प्लोयी एम्प्लोयर मॅपिंग) पोर्टलशी संलग्न करण्यात येत आहे. सध्या 800 पेक्षा जास्त नियोक्त्यांची असीम पोर्टलवर नोंदणी असून त्यांनी भारतात 5 लाख पेक्षा जास्त कर्मचाऱ्यांची एकत्रित मागणी नोंदवली आहे. रोजगार पुरवणाऱ्यासाठी विशिष्ट स्वदेस उमेदवाराचा शोधही असीम द्वारे घेतला जात आहे. आखाती देशातून परतलेल्या व्यक्तिंसह इतर कामगारांना, इतर देशात वाव आहे. स्थलांतरीतांसाठीच्या कॉरीडॉरसह विविध देशांशी केलेल्या सामंजस्य कराराअंतर्गत या कामगारांना काम करण्यासाठी वाव आहे.
Jaydevi PS/N.Chitale/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1697507)
Visitor Counter : 223