वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय

कोरोना काळात महत्वाच्या क्षेत्रातल्या उत्पादनात झालेल्या घसरणीनंतर आता सुधारण्याचे संकेत

Posted On: 12 FEB 2021 2:10PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 12 फेब्रुवारी 2021

एप्रिल 2020 मध्ये झालेल्या मोठ्या घसरणीनंतर मुख्य आठ उद्योगातल्या औद्योगिक उत्पादनाचा सर्वसाधारण वृद्धी दर सुधारण्याचे संकेत दिसत आहेत. मार्च 2020 पासून आठ प्रमुख उद्योगातला क्षेत्र निहाय आणि महिन्यानुसार तपशील परिशिष्टात देण्यात आला आहे. कोविड-19 ची अचानक आलेली लाट यामुळे अमेरिका, युरोपियन महासंघ, ब्रिटन आणि जपान यासारख्या जगातल्या प्रमुख अर्थव्यवस्थांना मोठा फटका बसला. देशात लागू करण्यात आलेल्या लॉक डाऊनमुळे भारतातही विविध क्षेत्रात याचा परिणाम झाला.मात्र लॉक डाऊन शिथिल झाल्यानंतर अर्थव्यवस्थेच्या अनेक क्षेत्रात सुधारणा दिसून आली.

औद्योगिक उत्पादन आणि सकल राष्ट्रीय उत्पादनाला चालना देण्यासाठी केंद्र सरकारने अनेक महत्वाच्या सुधारणा राबवल्या. नादारी आणि दिवाळखोरी संदर्भातला कायदा आणण्याबरोबरच बँकांचे पुनर्भांडवलीकरण करण्यात आले आहे. अप्रत्यक्ष कर सुलभ करण्यासाठी वस्तू आणि सेवा कर, देशांतर्गत उत्पादन क्षमता वाढवण्यासाठी मेक इन  इंडिया कार्यक्रम, परकीय गुंतवणुकीसाठी  अधिक व्यापक धोरण, अधिक पारदर्शकतेसाठी जन धन-आधार-मोबाईल यांचा इतर महत्वाच्या सुधारणात समावेश आहे.

देशात कोरोना महामारीच्या बसलेल्या फटक्यातून सावरण्यासाठी  भारताच्या  सकल राष्ट्रीय उत्पादनाच्या 13 टक्के म्हणजे 27.1 लाख कोटी रुपयांचे विशेष आर्थिक आणि सर्वसमावेशक पॅकेज सरकारने जाहीर केले आहे.केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग राज्य मंत्री सोम प्रकाश यांनी आज राज्य सभेत लेखी उत्तरात ही माहिती दिली.

अधिक माहितीसाठी क्लिक करा

परिशिष्ट

Months/Years

Overall Growth rate

Coal

Crude Oil

Natural Gas

Petroleum Refinery Products 

Fertilizers 

Steel

Cement

Electricity 

Weight (%)

 

10.33

8.98

6.88

28.04

2.63

17.92

5.37

19.85

Mar-20

-8.6

4.0

-5.5

-15.1

-0.5

-11.9

-21.9

-25.1

-8.2

Apr-20

-37.9

-15.5

-6.4

-19.9

-24.2

-4.5

-82.8

-85.2

-22.9

May-20

-21.4

-14.0

-7.1

-16.8

-21.3

7.5

-40.4

-21.4

-14.8

Jun-20

-12.4

-15.5

-6.0

-12.0

-8.9

4.2

-23.2

-6.8

-10.0

Jul-20

-7.6

-5.7

-4.9

-10.2

-13.9

6.9

-6.5

-13.5

-2.4

Aug-20

-6.9

3.6

-6.3

-9.5

-19.1

7.3

0.5

-14.5

-1.8

Sep-20

0.6

21.0

-6.0

-10.6

-9.5

-0.3

6.2

-3.4

4.8

Oct-20*

-0.9

11.7

-6.2

-8.6

-17.0

6.3

4.0

3.2

11.2

Nov-20*

-1.4

3.3

-4.9

-9.3

-4.8

1.6

-0.5

-7.3

3.5

Dec-20*

-1.3

2.2

-3.6

-7.2

-2.8

-2.9

-2.7

-9.7

4.2

2020-21(Apr-Dec)*

-10.1

-1.9

-5.7

-11.6

-13.5

3.0

-16.7

-18.3

-3.7

M.Chopade/N.Chitale/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1697343) Visitor Counter : 169


Read this release in: English , Manipuri , Bengali , Tamil