संरक्षण मंत्रालय

दिव्य दृष्टी 2021 : मल्टी डोमेन ऑपरेशन बाबत भारतीय लष्कराचे राष्ट्रीय चर्चा सत्र आणि वेबिनार

Posted On: 11 FEB 2021 9:24PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 11 फेब्रुवारी 2021

 

भारतीय लष्कराचे मल्टी डोमेन ऑपरेशन- संघर्ष विषयक भविष्य  याबाबत, ‘दिव्य दृष्टी 2021’ हे  राष्ट्रीय चर्चा सत्र आणि वेबिनार, सेंटर फॉर वॉरफेअर स्टडीने 11 फेब्रुवारीला आयोजित केले. दिव्य दृष्टी म्हणजे माहितीपूर्ण दृष्टिकोनासाठी आवश्यक आकलनविषयक धारणा असा असून मल्टी डोमेन ऑपरेशन( एमडीओ) सारख्या जटील आणि गुंतागुंतीच्या आणि नव्याने उदयाला येणाऱ्या विषयावर राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय तज्ञांना एकत्र  आणण्याचा यामागचा उद्देश आहे.

लष्कर प्रमुख जनरल एम एम नरवणे, लष्कर उप प्रमुख लेफ्टनंट जनरल सी पी मोहंती यांच्यासह लष्कराची तीनही दले,संरक्षण मंत्रालयातले इतर पदाधिकारी, संरक्षण विषयक विचारवंत, माध्यम सदस्य वेबिनारला उपस्थित होते.

आपल्या राष्ट्रीय सुरक्षेला भविष्यात असणारी आव्हाने आणि धोके याबरोबरच याबाबत सर्वच स्तरावर सतर्क राहण्याच्या आवश्यकतेवर  वर लष्कर प्रमुखांनी उद्‌घाटनपर भाषणात भर दिला. सीमेवर असणाऱ्या धोक्यासह दहशतवादाला काही देशांकडून मिळणारे खतपाणी यामुळे भारतीय लष्कराला, देशाची प्रादेशिक अखंडता कायम राखण्यासाठी विविध क्षेत्रात धोक्याला तोंड देण्यासाठी सज्ज राहण्याची गरज आहे असे ते म्हणाले.

M.Chopade/N.Chitale/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1697324) Visitor Counter : 207


Read this release in: English , Urdu , Hindi , Tamil