गृह आणि शहरी व्यवहार मंत्रालय
अमृत अंतर्गत 78,910 कोटी रुपयांचे प्रकल्प हाती घेण्यात आले
Posted On:
11 FEB 2021 7:58PM by PIB Mumbai
नवनिर्माण व शहरी विभाग परिवर्तनासाठी अटल मिशनचा (AMRUT) आरंभ 25 जून 2015 रोजी देशातील 500 निवडक शहरांमध्ये करण्यात आला. पाणीपुरवठा, गटारे व सांडपाणी व्यवस्थापन, पुरनियंत्रण, मोटारविना शहरी वाहतूक, हरित पट्ट्यांचा व बागांचा विकास या शहरी मुलभूत सुविधांच्या विकासाचे लक्ष्य हे AMRUT योजनेचे उद्दिष्ट आहे.
AMRUT अंतर्गत, निवड, मूल्यमापन, शहरांतील प्रकल्पांची निवड व मान्यता हे राज्ये व केंद्रशासित प्रदेश तसेच संबधित शहरी स्थानिक संस्थांकडे सोपवण्यात आले आहेत. राज्यांकडून देण्यात आलेल्या राज्यांसाठीच्या वार्षिक कृती योजनांचाही(SAAPs) मंजूरीसाठी विचार करण्यात येईल.
गृहनिर्माण व शहरी कार्यक्रम राज्यमंत्री (स्वतंत्र कार्यभार) हरदीपसिंग पुरी यांनी आज लोकसभेत लेखी उत्तराद्वारे ही माहिती दिली.
***
S.Tupe/V.Sahajrao/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1697200)
Visitor Counter : 267