शिक्षण मंत्रालय
केंद्रीय अर्थसंकल्प 2021-2022: शालेय शिक्षण आणि साक्षरता विभागासाठी ठळक मुद्दे
राष्ट्रीय डिजिटल शिक्षण आर्किटेक्चर (एनडीईएआर) स्थापन केले जाईल
Posted On:
10 FEB 2021 10:21PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 10 फेब्रुवारी 2021
केंद्रीय अर्थसंकल्प 2021-22 मध्ये डिजिटल फर्स्ट माइंडसेटच्या संदर्भात राष्ट्रीय डिजिटल शैक्षणिक आर्किटेक्चर (एनडीईएआर) स्थापनेची घोषणा करून शिक्षणासाठी देशातील डिजिटल पायाभूत सुविधा मजबूत करण्यावर भर देण्यात आला आहे, जिथे डिजिटल आर्किटेक्चर केवळ अध्यापन आणि शिकण्याला साहाय्य करत नाही. तर शैक्षणिक नियोजन, केंद्र आणि राज्ये/केंद्रशासित प्रदेशांचे प्रशासनिक कार्य देखील पाहते
हे डिजिटल पायाभूत सुविधांच्या विकासासाठी वैविध्यपूर्ण शिक्षण परिसंस्था प्रदान करेल, जी सर्व हितधारकांची, विशेषत: राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांची स्वायत्तता सुनिश्चित करेल.
एनडीईएआर ही शिक्षणासाठी डिजिटल पायाभूत सुविधा असल्याचे मानले जात आहे. वेगवान डिजिटल शिकण्याचा अनुभव मिळण्यामुळे शालेय शिक्षण नियोजन, प्रशासन तसेच शिक्षक, विद्यार्थी व शाळांसाठी एनडीईएआर फायदेशीर ठरेल. संस्थात्मक संरचना, प्रशासन आराखडा, तंत्रज्ञान आणि एनडीईएआरचा डेटा यामुळे संपूर्ण विद्यार्थी आणि शिक्षक समुदायाला फायदा होईल.
* * *
S.Tupe/S.Kane/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1696946)
Visitor Counter : 190