रसायन आणि खते मंत्रालय
आसाममधील ब्रह्मपुत्रा खोरे खते महामंडळ मर्यादितसाठी 100 कोटी रुपयांचे अनुदान देण्याच्या प्रस्तावाला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी
Posted On:
10 FEB 2021 6:14PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 10 फेब्रुवारी 2021
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय मंत्रिमंडळाच्या अर्थविषयक समितीने आज आसामच्या नामरुप येथील ब्रह्मपुत्रा खोरे खते महामंडळ मर्यादित. या कंपनीला (BVFCL)100 कोटी रुपयांचे अनुदानापोटी अर्थसहाय्य देण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली. या कंपनीमध्ये युरिया उत्पादन विभागाचे कार्य अखंड सुरु राहावे यासाठी हे अनुदान दिले जात आहे.
बीवीएफसीएल, नामरूप ही एक सार्वजनिक क्षेत्रातील कंपनी असून कंपनी कायद्याखाली तिची स्थापना करण्यात आली आहे. या कंपनीवर रसायन आणि खते मंत्रालयाचे प्रशासकीय नियंत्रण आहे, सध्या कंपनीचे दोन जुने विभाग नामरूप-2 आणि नामरूप-3 कार्यरत आहेत. ही देशातली पहिली वायू आधारित युरिया उत्पादक कंपनी असून त्यात सर्व प्रकारच्या पायाभूत सुविधा आणि कच्चा माल उपलब्ध आहे. मात्र तरीही कंपनीतील मशिनरी जुनी आणि कालबाह्य झाल्यामुळे झाल्यामुळे कंपनीला वाजवी दरात अपेक्षित उत्पादन करणे कठीण होत आहे. या प्रकल्पांची सुरक्षितता,शाश्वतता आणि वित्तीय व्यवहार योग्य तऱ्हेने सुरु राहावेत, यासाठी इथली सर्व यंत्रे बदलवणे किंवा त्यांची दुरुस्ती करणे आवश्यक झाले आहे. यंत्रे, इलेक्ट्रिकल साहित्य आणि इतर उपकरणे खरेदी करुन या कारखान्याचे काम पुन्हा सुरु करता येईल. या सर्व कामांसाठी 100 कोटी रुपयांची गरज आहे त्यामुळे, केंद्र सरकारने या कंपनीला अनुदानाच्या रूपाने ही रक्कम देण्यास मंजुरी दिली आहे.
ईशान्य भारतात असलेली BVFCL ही कंपनी या भागाच्या आर्थिक विकासात मोठा हातभार लावते. या कंपनीला मिळालेल्या अनुदानाच्या रकमेमुळे युरिया उत्पादनाची क्षमता प्रती वर्ष 3.90 लाख मेट्रिक टनपर्यंत सुनिश्चित होईल आणि त्यामुळे इथल्या चहा बागांना तसेच इतर कृषीक्षेत्राला वेळेत युरियाचा पुरवठा होऊ शकेल.
तसेच यामुळे या कारखान्यात असलेले 580 कायमस्वरुपी कर्मचारी आणि इतर 1500 अस्थायी कामगारांचा रोजगारही वाचू शकेल. यामुळे पर्यायाने ‘आत्मनिर्भर भारताच्या मोहिमेला बळ मिळेल.
* * *
Jaydevi PS/R.Aghor/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1696849)
Visitor Counter : 139