अंतराळ विभाग

भारताने आजपर्यंत विविध 33 देशातील 328 उपग्रह केले प्रक्षेपित - डॉ. जितेंद्र सिंग

Posted On: 10 FEB 2021 6:01PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 10 फेब्रुवारी 2021

 

ईशान्य क्षेत्र विकास, पंतप्रधान कार्यालय, कार्मिक, सार्वजनिक तक्रारी, निवृत्तिवेतन, अणुऊर्जा आणि अंतराळ केंद्रीय राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) डॉ.जितेंद्र सिंग म्हणाले की,  उपग्रह प्रक्षेपण क्षमता विकसित करण्यासाठी भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रोला 2020-21 या आर्थिक वर्षात 900 कोटी रुपये देण्यात आले. लोकसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात  त्यांनी सांगितले की, अंतराळ विभाग दीर्घ काळापासून परदेशी उपग्रह प्रक्षेपित करण्यात गुंतला आहे. आतापर्यंत विविध 33 देशातील 328 उपग्रह प्रक्षेपित करण्यात आले आहेत आणि आजपर्यंत 25 दशलक्ष डॉलर्स आणि 189 दशलक्ष युरो इतका महसूल प्राप्त झाला आहे. तसेच उपग्रह व्यवसायिकरित्या प्रक्षेपित करण्यासाठी आणि आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होण्यासाठी भारत सरकारने अंतराळ विभागाअंतर्गत , न्यू स्पेस इंडिया लिमिटेड (एनएसआयएल)  या सार्वजनिक क्षेत्रातील कंपनीची स्थापना केली आहे.

इस्रो उपग्रह प्रक्षेपण क्षमता विकसित करण्याच्या क्षेत्रात आत्मनिर्भर होण्याच्या दिशेने प्रयत्नशील आहे, त्यामुळेच यासाठी  परदेशी सहकार्य धोरण  आणण्याची कल्पना मांडलेली नाही. 

दुसऱ्या एका संबंधित प्रश्नाच्या उत्तरात जितेंद्र सिंग म्हणाले की,  भारतीय उद्योग आणि शैक्षणिक संस्थांना त्यांच्या अंतराळ यंत्रणेच्या परिक्षणासाठी ,इस्रोच्या सुविधा पुरविल्या जातात.

मंत्री म्हणाले की,अंतराळसंबंधी कामांमध्ये सहभागी होण्यासाठी खाजगी कंपन्यांना परवानगी देताना सरकारने राष्ट्रीय सुरक्षेसंदर्भातील मुद्द्यांचे आणि चिंतेचे विश्लेषण केले आहे .

* * *

M.Chopade/S.Chavan/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1696845) Visitor Counter : 491