अर्थ मंत्रालय
1.76 लाख कोटी रुपयांच्या पतमर्यादेसह 187.03 लाख किसान क्रेडिट कार्डांचे दिनांक 29 जानेवारी 2021 पर्यंत वितरण
Posted On:
09 FEB 2021 7:41PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 9 फेब्रुवारी 2021
शेतकऱ्यांना लाभ मिळावा यासाठी फेब्रुवारी 2020 पासून किसान क्रेडिट कार्ड ही विशेष योजना सुरू केली गेली. सार्वजनिक क्षेत्रातील बँक आणि नाबार्डने दिलेल्या माहितीनुसार दिनांक 29 जानेवारी 2021 पर्यंत 1.76 लाख कोटी रुपयांच्या पतमर्यादेसह 187.03 लाख किसान क्रेडिट कार्डांचे वितरण देशभरातील शेतकऱ्यांना करण्यात आले आहे.
ही माहिती केंद्रीय अर्थ आणि कॉर्पोरेट व्यवहार राज्यमंत्री अनुराग ठाकूर यांनी आज राज्यसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात दिली.
S.Tupe/S.Patgaonkar/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1696597)
Visitor Counter : 144