आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

कोविड-19 प्रतिबंधक लसीकरण – 24 व्या दिवसापर्यंतची अद्ययावत माहिती


देशात लसीकरण झालेल्यांचा आकडा 60 लाखांपर्यंत पोहोचवून भारत ठरला जगातील सर्वात वेगवान लसीकरण करणारा देश

एकूण 60 लाखांहून जास्त लाभार्थ्यांचे लसीकरण पूर्ण

आज संध्याकाळी 6 वाजेपर्यंत 2,23,298 लाभार्थ्यांना लस देण्यात आली

Posted On: 08 FEB 2021 10:04PM by PIB Mumbai

 

कोरोना महामारीविरुद्ध सुरु असलेल्या लढ्यात भारताने जागतिक पातळीवर आज आणखी एक शिखर सर केले.

देशभरात 60 लाख लाभार्थ्यांचे लसीकरण करून भारत जगातील सर्वात वेगाने लसीकरण करणारा देश ठरला आहे. भारताने हे यश अवघ्या 24 दिवसांमध्ये प्राप्त केले आहे. हा टप्पा गाठण्यासाठी अमेरिकेला 26 तर इंग्लंडला 46 दिवस लागले होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 16 जानेवारी 2021 रोजी देशव्यापी लसीकरण कार्यक्रमाला सुरुवात केली होती तर 2 फेब्रुवारी पासून आघाडीवरील कामगारांच्या लसीकरणाला सुरुवात करण्यात आली.

एकूण 1,24,744 सत्रांद्वारे राबविलेल्या मोहिमेत कोविड – 19 प्रतिबंधक लस घेतलेले आरोग्य सेवा कर्मचारी तसेच पहिल्या फळीतील कर्मचारी अशा सर्वांचा विचार केला तर आज  संध्याकाळी 6 वाजेपर्यंत भारताने 60 लाखांचा आकडा पार केला आहे. यामध्ये 54,12,270 आरोग्य सेवा कर्मचारी आहेत तर 6,23,390 पहिल्या फळीतील कर्मचारी आहेत.

आज, देशव्यापी कोविड-19 विरोधी लसीकरण मोहिमेच्या 24 व्या दिवशी, संध्याकाळी 6 वाजेपर्यंत एकूण 2,23,298 लाभार्थ्यांना लस देण्यात आली. आजच्या दिवसाचा अंतिम अहवाल रात्री उशिरा पूर्ण होईल.

 

S. No.

State/UT

Beneficiaries vaccinated

1

A & N Islands

3397

2

Andhra Pradesh

3,08,718

3

Arunachal Pradesh

12,931

4

Assam

97,379

5

Bihar

3,92,426

6

Chandigarh

6027

7

Chhattisgarh

1,81,276

8

Dadra & Nagar Haveli

1504

9

Daman & Diu

745

10

Delhi

1,13,138

11

Goa

8340

12

Gujarat

4,70,384

13

Haryana

1,48,027

14

Himachal Pradesh

56,594

15

Jammu & Kashmir

61,031

16

Jharkhand

1,17,210

17

Karnataka

4,11,861

18

Kerala

2,95,965

19

Ladakh

2234

20

Lakshadweep

839

21

Madhya Pradesh

3,62,649

22

Maharashtra

4,97,095

23

Manipur

9767

24

Meghalaya

7602

25

Mizoram

10937

26

Nagaland

4,917

27

Odisha

2,95,944

28

Puducherry

3761

29

Punjab

81,948

30

Rajasthan

4,62,962

31

Sikkim

5851

32

Tamil Nadu

1,66,408

33

Telangana

2,09,104

34

Tripura

44,621

35

Uttar Pradesh

6,73,542

36

Uttarakhand

77,907

37

West Bengal

3,68,562

38

Miscellaneous

62,057

Total

60,35,660

आज संध्याकाळी 6 वाजेपर्यंत लसीकरणाची 8,257 सत्रे घेण्यात आली.

आतापर्यंत, लसीकरणामुळे झाल्याचा संशय घेता येईल अशी कोणत्याही गंभीर स्वरुपाच्या प्रतिक्रियात्मक घटनेची अथवा मृत्यूची नोंद झालेली नाही. 

***

S.Tupe/S.Chitnis/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1696352) Visitor Counter : 168