माहिती आणि प्रसारण मंत्रालय
गरीबांच्या कल्याणासाठी सरकार वचनबद्ध - प्रकाश जावडेकर
केंद्रीय अर्थसंकल्प 2021 हा भारताला मजबूत बनवण्याचा उद्देश असलेला एक आत्मनिर्भर भारत अर्थसंकल्प आहे.
Posted On:
07 FEB 2021 3:55PM by PIB Mumbai
केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर म्हणाले की केंद्र सरकार गरीबांच्या कल्याणासाठी वचनबद्ध असून त्यांनी कुणावरही भार न टाकणारा आणि पुरोगामी अर्थसंकल्प सादर केला आहे.
केंद्राच्या विशेष संपर्क उपक्रमाचा एक भाग म्हणून पुण्यात पत्रकार परिषदेत बोलताना जावडेकर म्हणाले, "अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलेला केंद्रीय अर्थसंकल्प 2021-22 हा भारत "आत्मनिर्भर " बनविण्याच्या उद्देशाने एक सुनियोजित दस्तावेज आहे. अर्थसंकल्पात मूलभूत सुविधांचा विकास , रस्ते, वाहतूक, सुरक्षा आणि संरक्षणावर भर देण्यात आला आहे असे ते म्हणाले. केंद्रीय अर्थसंकल्पातून शेतकर्यांसह सर्वच क्षेत्रातील लोकांना फायदा होणार आहे. अनेक सुधारणात्मक उपक्रमांतून शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याची सरकारची वचनबद्धता त्यांनी अधोरेखित केली.
सरकार गरीबांच्या कल्याणासाठी आणि महिला सक्षमीकरणासाठी कटिबद्ध आहे यावर जावडेकर यांनी भर दिला . "प्रधानमंत्री आवास योजना, शौचालयांची व्यवस्था, गॅस, वीज, नळाद्वारे पाणी, बँक खाती उघडणे यासारख्या सर्व योजना कालबद्ध रीतीने प्रगती करत आहेत. उज्वला योजनेच्या माध्यमातून तब्बल 8 कोटी महिलांना लाभ झाला आहे. योजनेचा विस्तार केला जात असून एक कोटी महिला यात सामील होतील, ”असे ते म्हणाले.
कोविड -19 महामारीचा जागतिक अर्थव्यवस्थेवर विपरित परिणाम झाला असे सांगून जावडेकर म्हणाले, “भारतालाही मोठा फटका बसला आहे. अशा परिस्थितीत महसुलाचे नवीन स्त्रोत शोधणे आणि कर वाढवणे अनिवार्य होते. मात्र , या अर्थसंकल्पात कोणत्याही करात वाढ केलेली नाही.
'आत्मनिर्भर ' हा शब्द इतका लोकप्रिय झाला आहे की ऑक्सफर्ड शब्दकोशातही हा शब्द नवीन शब्द म्हणून जोडला आहे अशी आठवण त्यांनी करून दिली.
M.Chopade/S.Kane/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1696176)
Visitor Counter : 101