श्रम आणि रोजगार मंत्रालय

सुब्रह्मण्यन यांची राष्ट्रीय सुरक्षा परिषदेचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती

प्रविष्टि तिथि: 06 FEB 2021 3:17PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 6 फेब्रुवारी 2021

एस.एन.सुब्रह्मण्यन यांची तीन वर्षांच्या कालावधीसाठी राष्ट्रीय सुरक्षा परिषदेचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.  त्यांचा अनुभव राष्ट्रीय सुरक्षा परिषदेला मार्गदर्शक ठरणार आहे  जो नवीन व्यावसायिक सुरक्षा, आरोग्य व कार्यकारी अटींच्या संहिता, 2020 (ओएसएच कोड, 2020) अंतर्गत कामाच्या ठिकाणी सुरक्षा सुनिश्चित करणे या संदर्भात महत्वाची भूमिका ठरेल.

एल अँड टी लिमिटेडचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि व्यवस्थापकीय संचालक सुब्रह्मण्यन हे प्रख्यात अभियंता असून त्यांनी अनेक वर्षांपासून एल अँड टी च्या पायाभूत सुविधांच्या व्यवसायाचे नेतृत्व केले आहे आणि  कंपनीला देशातील सर्वात मोठी बांधकाम कंपनी म्हणून तसेच जगातील 14 व्या स्थानावर आणून नावारूपाला आणले आहे. एल अँड टी ही देशातील सर्वात मोठ्या अभियांत्रिकी कंपन्यांपैकी एक आहे जी अभियांत्रिकी, संरक्षण, जहाज इमारत इत्यादींमध्ये कार्यरत आहे.

 

S.Tupe/P.Malandkar

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(रिलीज़ आईडी: 1695783) आगंतुक पटल : 278
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Bengali , Manipuri , Tamil