संरक्षण मंत्रालय
HAL LUH (लष्करी वापरासाठी) ला प्राथमिक ऑपरेशनल क्लिअरन्स (चालन मंजुरी)
प्रविष्टि तिथि:
05 FEB 2021 6:24PM by PIB Mumbai
बेंगळुरूच्या येलहंका येथील एअरो इंडिया 2021 मध्ये 5 फेब्रुवारी 2021 रोजी, कमी वजनाच्या हेलीकॉप्टर (LUH) ना भारतीय लष्करासाठी सेंटर फॉर मिलीटरी एअरवर्दीनेस अँड सर्टीफिकेशन प्राथमिक चालन मंजूरी (IOC) संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात आले.
लष्करी दलांच्या परिचालन सेवांची गुणवत्ता वाढवण्याच्या तसेच त्यांना स्वयंपूर्ण करण्यासाठीच्या स्वदेशी संशोधन व विकास कार्यक्रमाला HAL ने चालना दिली आहे, असे प्रतिपादन हिंदूस्तान एअरॉनॉटिक्स लिमिटेड (HAL) चे अध्यक्ष व व्यवस्थापकिय संचालक आर माधवन यांनी यावेळी केले.
संचालक (अभियांत्रिकी तसेच संशोधन व विकास) अरुप चॅटर्जी यांनी प्राथमिक हेलीकॉप्टर सर्व परिस्थितीमध्ये तसेच सर्व प्रकारच्या हवामानात समाधानकारक कामगिरी करत असल्याचे सांगितले. हिंदूस्तान एअरॉनॉटिक्स लिमिटेड (HAL) सध्या कमी वजनाच्या हेलीकॉप्टर (LUH) मध्ये समग्रता व उड्डाण चाचणी मिशनवर काम करत आहे.
LUH हे HAL च्या रोटरी विंग रिसर्च अँड डिझाईन सेंटरने स्वदेशात अभिकल्पित व निर्मित केलेले 3 टन वर्गातील नवीन जनरेशनचे एक इंजिन असलेले हेलीकॉप्टर आहे. यामध्ये भारतातील एकमेव अशा विविध चालन परिस्थितीनुकुल वैशिष्टे आहेत. ही कमी वजनाची हेलीकॉप्टर दलांकडून वापरल्या जाणाऱ्या चीता/चेतक या जुन्या ताफ्यातील हेलीकॉप्टर्सची जागा घेतील.
LUH ही Ardiden 1U या फ्रान्सच्या M/s. Safran Helicopter Engine (SHE), निर्मित एकल टर्बो शाफ्ट इंजिनने सज्ज आहे. हिमालयाच्या उंच पर्वतरांगांमधील कामगिरी पार पाडण्यासाठी ते योग्य असे हेलीकॉप्टर आहे.
***
S.Thakur/V.Sahajrao/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 1695572)
आगंतुक पटल : 202