गृह आणि शहरी व्यवहार मंत्रालय
पंतप्रधान स्वनिधी योजनेत 31 जानेवारी 2021 पर्यंत कर्जासाठी 33.7 लाखांहून अधिक अर्ज
18.4 लाखांहून अधिक कर्जे मंजूर व 13.8 लाखांहून आधिक कर्जे वितरीत
Posted On:
04 FEB 2021 10:15PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 4 फेब्रुवारी 2021
गृहनिर्माण व शहरी कार्यक्रम मंत्रालयाने दारिद्र्य तसेच शहरी गरीब वर्गाला भेडसावणारी असुरक्षितता यांचे निर्मुलन करण्याच्या उद्देशाने ‘दीनदयाल अंत्योद्य योजना – राष्ट्रीय शहरी जीवनोन्नती अभियान ’ अंतर्गत (DAY-NULM) पंतप्रधान स्वनिधी ही केंद्र पुरस्कृत योजना आणली आहे. शहरी फेरीवाल्यांना (SUSV) रोजगार कमाईच्या दृष्टीने व्यवस्थित जागा, संस्थांकडून कर्ज, सामाजिक सुरक्षा आदींसाठी सहाय्य करून रोजगार मिळवून देणे हा या योजनेचा एक भाग आहे.
मंत्रालयाने अनुषांगिक भांडवली खर्चासाठी 50 लाख फेरीवाल्यांना त्यांचा व्यवसाय पुन्हा सुरू करण्यास एक वर्षाच्या कालावधीचे रु 10,000 चे कर्ज देऊ करणारी पंतप्रधान फेरीवाले आत्मनिर्भर निधी (PM SVANidhi) योजना 01 जून 2020 ला सुरू केली. याशिवाय रस्त्यावरील खाद्यविक्रेत्यांना ऑन बोर्ड ई-कॉमर्स मंच उपलब्ध करुन देण्यासही मंत्रालय मदत करत आहे.
‘दीनदयाल अंत्योद्य योजना – राष्ट्रीय शहरी जीवनोन्नती अभियान ’’ (DAY-NULM) अंतर्गत राज्ये तसेच केंद्रशासित प्रदेशांमधीन 42 लाख फेरीवाल्यांची नोंदणी करण्यात आली आहे. 21.7 लाख फेरीवाल्यांना विक्री परवाने व 24.4 लाख फेरीवाल्यांना ओळखपत्रे वाटण्यात आली आहेत.
पंतप्रधान स्वनिधी योजनेअंतर्गत कर्ज घेण्यासाठी 33.7 लाख अर्ज 31.01.2021 या तारखेपर्यंत प्राप्त झाले. यापैकी 18.4 लाख कर्जे मंजूर झाली तर 13.8 लाख कर्जे वितरीत करण्यात आली.
‘दीनदयाल अंत्योद्य योजना – राष्ट्रीय शहरी जीवनोन्नती अभियान ’ (DAY-NULM) ही राष्ट्रीय, राज्य व शहरी स्थानिक स्वराज्य संस्था या त्रिस्तरीय व्यवस्थापनाद्वारे देशभरात राबवलेली योजना आहे.
सिडबी अर्थात लघुउद्योग विकास बँक ही पंतप्रधान स्वनिधी या केंद्रीय क्षेत्र योजनेची अंमलबजावणी भागीदार तसेच कर्जदाती बँक आहे. फेरीवाल्यांची ओळख पटवून त्यांना कर्जाचे वितरण करणे या सर्वात या बँकेची महत्वपूर्ण भूमिका आहे.
गृहबांधणी व शहरी विकास कार्यक्रमाचे राज्यमंत्री हरदीपसिंग पुरी यांनी आज लोकसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात ही माहिती दिली.
* * *
Jaydevi PS/V.Sahajrao/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1695320)
Visitor Counter : 142