अर्थ मंत्रालय
2021 च्या अर्थसंकल्पात भारतीय अर्थव्यवस्थेसाठी दिशात्मक बदल घडण्याची स्पष्ट चिन्हे आहेतः अर्थमंत्री निर्मला सीतारमण
पायाभूत सुविधा, आरोग्य आणि शेती - तीन मोठी क्षेत्रे ज्यावर अधिक खर्च होईल
सरकार एकटे वाढत्या आणि महत्वाकांक्षी भारताची मागणी पूर्ण करू शकत नाही, उद्योगाने पुढे आले पाहिजे
Posted On:
04 FEB 2021 8:45PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 4 फेब्रुवारी 2021
“हा अर्थसंकल्प भारतीय अर्थव्यवस्थेसाठी स्पष्ट दिशात्मक बदल दर्शवतो आणि हा बदल सरकारने अचानकपणे आणलेला नाही, तर 30 वर्षांहून अधिक काळ भारतीयांच्या मनात घोळत होता,” असे केंद्रीय अर्थमंत्री आणि कंपनी व्यवहार मंत्री निर्मला सीतारमण यांनी सांगितले. त्या आज नवी दिल्लीत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे फिक्कीच्या राष्ट्रीय कार्यकारी समितीच्या बैठकीला संबोधित करत होत्या.
“हा अर्थसंकल्प संसाधने वाढवणारा आहे मात्र वाढीव कर त्यात नाही. अर्थसंकल्पात एक दिशात्मक बदल आहे, जो इतका वेगळा आहे की यामुळे भारतीयांना योग्य संधी मिळाल्यास त्यांच्या उद्यमशीलतेला प्रोत्साहन मिळेल. ”
त्या पुढे म्हणाल्या की यावर्षी महसुली उत्पन्नात सुधारणा होईल असा आम्हाला विश्वास आहे आणि अन्य मालमत्तांच्या मुद्रीकरणाद्वारे निर्गुंतवणुकी व्यतिरिक्त देखील बिगर -कर महसूल येईल अशी आम्हाला आशा आहे.
गुंतवणूक करण्यासाठी उद्योगांनी पुढे यावे असे आवाहनही सीतारमण यांनी केले. “मला आशा आहे की ज्या भावनेने अर्थसंकल्प तुमच्यासमोर मांडला ते उद्योग क्षेत्र समजू शकेल . उद्योग खेत्राची सर्व कर्ज फेडल्यानंतर आता ते विस्तार आणि वाढीसाठी पैशांची गुंतवणूक करण्याच्या स्थितीत असतील आणि तंत्रज्ञानाच्या दृष्टीने कोणत्याही संयुक्त उपक्रमात सहभागी व्हायला तयार हवे." यावर सीतारमण यांनी भर दिला.
अर्थमंत्री पुढे म्हणाल्या की, अर्थव्यवस्थेला त्वरित चालना देण्यासाठी सरकार सार्वजनिक पायाभूत सुविधांमध्ये मोठ्या प्रमाणात खर्च करणार आहे आणि पायाभूत सुविधा, आरोग्य आणि कृषी या प्रमुख क्षेत्रांमध्ये सर्वाधिक खर्च होईल.
विकास वित्तीय संस्था स्थापनेवर बोलताना सीतारमण म्हणाल्या की आम्ही एक विकास वित्तीय संस्था (डीएफआय) सक्षम करू आणि दीर्घकालीन पायाभूत सुविधांचा संपूर्ण वित्तपुरवठा बाजारपेठ नियंत्रित मार्गाने होईल.
अर्थसंकल्पात एक विश्वासार्ह आणि पारदर्शक वित्तीय विवरण आहे असे अर्थमंत्री म्हणाल्या.
फिक्कीचे अध्यक्ष उदय शंकर म्हणाले की या अर्थसंकल्पातील सर्वात समाधानकारक बाब म्हणजे करात फारसे बदल केलेले आपल्याला दिसले नाहीत . यामुळे धोरण निश्चितता आणि गुंतवणूकदारांचा आत्मविश्वास वाढेल.
* * *
Jaydevi PS/S.Kane/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1695298)