शिक्षण मंत्रालय
पेटंट जागृतीसाठी 'कपिला'
Posted On:
04 FEB 2021 5:48PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 4 फेब्रुवारी 2021
बौद्धिक संपदा साक्षरता आणि पेटंट जागृतीसाठी केंद्र सरकारने 15 ऑक्टोबर 2020 रोजी 'बौद्धिक संपदा साक्षरता आणि जागरूकता अभियान कलाम कार्यक्रम (कपिला)' सुरु केला. उच्च शिक्षण संस्थामध्ये प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांनी केलेल्या संशोधनाचे आयपी संरक्षण करणे, आयपीआरवर क्रेडिट अभ्यासक्रमाचा विकास, प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांसाठी आयपीआरवर प्रशिक्षण कार्यक्रम आणि आयपी फाइलिंग सिस्टमची ओळख आणि विकास याबाबत जनजागृती करणे हा या कार्यक्रमाचा उद्देश आहे.
आतापर्यंत, कपिलासाठी एकूण 46,556 वापरकर्त्यांची नोंदणी झाली आहे.
केंद्रीय शिक्षण मंत्री रमेश पोखरियाल ‘निशंक’ यांनी आज राज्यसभेत लेखी उत्तरात ही माहिती दिली.
* * *
M.Chopade/S.Kane/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1695184)
Visitor Counter : 312