श्रम आणि रोजगार मंत्रालय

एल अँड टी लिमिटेडचे ​​मुख्य कार्यकारी अधिकारी आणि व्यवस्थापकीय संचालक एस.एन.सुब्रह्मण्यन यांची राष्ट्रीय सुरक्षा परिषदेचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती

प्रविष्टि तिथि: 04 FEB 2021 5:05PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 4 फेब्रुवारी 2021


कामगार  आणि रोजगार मंत्रालयाने,एल अँड टी लिमिटेडचे ​​मुख्य कार्यकारी अधिकारी आणि व्यवस्थापकीय संचालक, एस.एन.सुब्रह्मण्यन यांना तीन वर्षांच्या कालावधीसाठी राष्ट्रीय सुरक्षा परिषदेचे अध्यक्ष म्हणून नियुक्त केले आहे. सुब्रह्मण्यन हे प्रख्यात अभियंता आहेत ज्यांनी अनेक वर्षांपासून एल अँड टीच्या पायाभूत सुविधांच्या व्यवसायाचे नेतृत्व केले आहे आणि  कंपनीला देशातील सर्वात मोठी बांधकाम कंपनी म्हणून तसेच जगातील 14 व्या स्थानावर आणून नावारूपाला आणले आहे. एल अँड टी ही देशातील सर्वात मोठ्या अभियांत्रिकी कंपन्यांपैकी एक आहे जी अभियांत्रिकी, संरक्षण, जहाज इमारत इत्यादींमध्ये कार्यरत आहे.


* * *

S.Tupe/S.Patgaonkar/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(रिलीज़ आईडी: 1695159) आगंतुक पटल : 270
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Manipuri , Tamil