सामाजिक न्याय आणि सबलीकरण मंत्रालय

ट्रान्सजेन्डर्सच्या कल्याणासाठी सरकार सर्वसमावेशक योजनेवर काम करीत आहे: रतनलाल कटारिया

Posted On: 04 FEB 2021 4:30PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 4 फेब्रुवारी 2021

 

आरोग्य, शिक्षण, कल्याण, कौशल्य विकास, निवारा यासारख्या ट्रान्सजेन्डर्सच्या प्रश्नांची दखल घेण्यासाठी आणि त्यांच्या चरितार्थासाठी आर्थिक सहाय्य म्हणून सरकार एकछत्री योजना राबवण्याचा विचार करत असल्याची माहिती केंद्रीय सामाजिक न्याय आणि सबलीकरण राज्यमंत्री रतनलाल कटारिया यांनी संसदेत निवेदनाद्वारे दिली. तेलंगणातील मलकाजगिरी मतदारसंघातील खासदार अनुमुला रेवंत रेड्डी यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना हे निवेदन देण्यात आले.

कोविड महामारीच्या काळात मंत्रालयातर्फे ट्रान्सजेन्डर्स समाजाला प्रति व्यक्ती 1500 रुपये अर्थसहाय्य देण्यात आले. समुदायाला देण्यात आलेल्या मदतीसंदर्भात श्री कटारिया यांनी माहिती दिली की मंत्रालयामार्फत एकूण 5711 ट्रान्सजेन्डर्स व्यक्तींना थेट लाभ हस्तांतरणाचा फायदा झाला.

 

अधिक माहितीसाठी कृपया येथे क्लिक करा.


* * *

M.Chopade/V.Joshi/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1695143) Visitor Counter : 147