श्रम आणि रोजगार मंत्रालय

युवा रोजगार

Posted On: 03 FEB 2021 6:01PM by PIB Mumbai

 

सांख्यिकी व कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाचे राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालय (एनएसओ) सन 2017 पासून रोजगार आणि बेरोजगारीवरील वार्षिक नियमित कामगार बल सर्वेक्षण (पीएलएफएस) करते. पीएलएफएस 2018-19 नुसार, 15 वर्षे व त्यावरील वयोगटातील व्यक्तींसाठी अंदाजे बेरोजगारी दर देशातील सामान्य स्थितीनुसार (मुख्य स्थिती + दुय्यम स्थिती) 5.8% आहे. सांख्यिकी व कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाच्या संकेतस्थळावर (https://www.mospi.nic.inहा अहवाल उपलब्ध आहे.

खेड्यात परत आलेल्या परप्रांतीय कामगारांना रोजगार आणि उपजीविकेच्या संधींना चालना देण्यासाठी कोविड -19 च्या उद्रेकानंतर भारत सरकारने 20 जून 2020 रोजी गरीब कल्याण रोजगार अभियान सुरू केले.

50 लाख फेरीवाल्यांना पुन्हा व्यवसाय सुरू करण्यासाठी भारत सरकारने एक वर्षाच्या मुदतीसाठी 10,000 रुपयांपर्यंत तारणमुक्त भांडवली कर्जाची सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी पीएम-स्वनिधी योजना सुरू केली आहे.

 

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा

****

M.Chopade/V.Joshi/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com(Release ID: 1694827) Visitor Counter : 128