संरक्षण मंत्रालय

बीईएल एरो इंडिया 2021 दरम्यान ‘आत्मनिर्भर भारत’ चा भाग म्हणून विकसित केलेली जवळपास 30 उत्पादने / प्रणाली प्रदर्शित करणार

Posted On: 02 FEB 2021 4:00PM by PIB Mumbai

 

संरक्षण क्षेत्रातील सार्वजनिक भागीदारी कंपनी, भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड (बीईएल) बंगळूरू मधील यलाहंका हवाई तळावर 3 ते 5 फेब्रुवारी 2021 दरम्यान आयोजित केलेल्या एरो इंडिया 2021 मध्ये अत्याधुनिक उत्पादने आणि त्यांच्या व्यवसायातील प्रत्येक क्षेत्रातील प्रणालीं प्रदर्शित करणार आहे. उत्पादने आणि प्रणाली यांना 'हवाई आणि अंतराळ उपयोजन’, 'उपग्रह आणि अंतराळ उपयोजन’, 'आत्मनिर्भरतेसाठी उत्पादने आणि प्रणाली (आत्मनिर्भर भारत)', 'उच्च कार्यप्रदर्शन आणि कृत्रिम बुद्धिमत्ता प्रणाली’, भूमी आणि नौदल उत्पादने’ ‘दळणवळण आणि लेझर आधारित उत्पादने’, ‘बिगैर-संरक्षण/विविधता आणि मैदानी (बाह्य) प्रदर्शन उत्पादने’ यामध्ये वर्गीकृत केले आहे.

याव्यतिरिक्त, बीईएल आपल्या काही नवीन उत्पादने आणि तंत्रज्ञानाच्या प्रात्यक्षिकाच्या माध्यमातून आपली संशोधन आणि विकास क्षमता दर्शवेल. आत्मनिर्भर भारत उपक्रमाचा भाग म्हणून विकसित केलेली एकूण 30 उत्पादने आणि प्रणाली येथे प्रदर्शित करण्यात येणार असून यामध्ये हवाई क्षेपणास्त्र इलेक्ट्रॉनिक्स, ईडब्ल्यू प्रणाल्यांसाठी रिसीव्हर्स आणि 2 केडब्ल्यू इंधन सेल, एफओ गायरो आधारित सेन्सर पॅकेज युनिट, आथ्रेमल लेझर ट्रान्समिटर, आयआर जैमर, कॉल व्यवस्थापक आणि मीडिया गेटवे, सी-बँड ट्रोपो पॉवर अ‍ॅम्पलीफायर आणि आयआर साधक मिसाईल यासारख्या अनेक बाबींचा समावेश आहे.

याशिवाय व्हेंटिलेटर आणि डायलिसिस मशीन, आयओटी (इंटरनेट ऑफ थिंग्स) घटकासह स्मार्ट सिटी व्यासपीठ इ. सारख्या उत्पादनांचे प्रदर्शनही केले जाईल. बीईएलच्या मैदानी प्रदर्शनाचे मुख्य आकर्षण म्हणजे मिनी शेल्टर आधारित मिनी सी4आय प्रणाली, अतुल्य (एडीएफसीआर), सीटीएफसीआर (एक्स-एपीआर ऑन 4x4), डब्ल्यूएलआर (माउंटन व्हर्जन) आणि अँटी ड्रोन प्रणली हे आहे.

 

तपशीलवार बातमीसाठी कृपया येथे क्लिक करा

 

M.Chopade/S.Mhatre/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1694419) Visitor Counter : 195