राष्ट्रपती कार्यालय
राष्ट्रपती भवन जनतेसाठी येत्या शनिवारपासून म्हणजे दिनांक 6 फेब्रुवारी पासून पुन्हा खुले
Posted On:
01 FEB 2021 11:02PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 1 फेब्रुवारी 2021
राष्ट्रपती भवन सामान्य जनतेसाठी येत्या शनिवारपासून म्हणजे दिनांक 6फेब्रुवारी पासून पुन्हा खुले होणारआहे, कोविड-19 मुळे 13 मार्च 2020 पासून बंद करण्यात आले होते. शनिवार आणि रविवारी (सार्वजनिक सुट्ट्यांचे दिवस सोडून) ते खुले रहाणार आहे .अभ्यागतांना https://presidentofindia.nic.in किंवा https://rashtrapatisachivalaya.gov.in/ या संकेतस्थळावर जाऊन आँनलाईन पध्दतीने आपल्या भेटीची आगाऊ नोंदणी करता येईल. पूर्वीप्रमाणेच 50 रुपये जुजबी फी यासाठी आकारली जाईल.
शारिरीक अंतराच्या निकषानुसार 10:30,12:30,4:30 यावेळांत आगाऊ नोंदणी नक्की करत येईल,जास्तीत जास्त 25 जणांना एका निर्धारित वेळी प्रवेश दिला जाईल .भेटीदरम्यान अभ्यागतांना मास्क घालणे ,शारिरीक अंतर पाळणे या कोविड मार्गदर्शक सूचनांचे पालन करावे लागेल.
* * *
Jaydevi PS/S.Patgaonkar/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1694287)
Visitor Counter : 114