माहिती आणि प्रसारण मंत्रालय
हा पुरोगामी अर्थसंकल्प आहे: प्रकाश जावडेकर
Posted On:
01 FEB 2021 6:55PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 1 फेब्रुवारी 2021
केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर म्हणाले कि हा पुरोगामी अर्थसंकल्प आहे. केंद्रीय अर्थमंत्री श्रीमती निर्मला सीतारमण यांनी संसदेत केंद्रीय अर्थसंकल्प 2021-22 सादर केल्यानंतर माध्यमांशी बोलताना जावडेकर म्हणाले की कोरोना महामारीमुळे जगभरातील अर्थव्यवस्थांना मोठा फटका बसला आहे. मात्र भारताने कोविड विरुद्ध युद्ध तर जिंकलेच शिवाय गरीबी विरोधात आणि समृद्धीच्या दिशेने पुढे वाटचालही सुरु केली.
भांडवली खर्चामध्ये मोठी वाढ केल्याचे अधोरेखित करत ते म्हणाले की पायाभूत सुविधांमध्ये पाच लाख कोटी रुपयांहून अधिक गुंतवणूक हा एक मोठा निर्णय आहे. यामुळे रोजगाराला मोठी चालना मिळेल, असेही ते म्हणाले.
***
M.Chopade/S.Kane/DY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1694184)
Visitor Counter : 137