संरक्षण मंत्रालय

भारतीय तटरक्षक दल साजरा करणार 45 वा स्थापना दिवस

Posted On: 31 JAN 2021 2:42PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 31 जानेवारी 2021

 

भारतीय तटरक्षक दल 1 फेब्रुवारी 2021 रोजी 45 वा स्थापना दिवस साजरा करणार आहे. 1978 मध्ये केवळ 7 सरफेस प्लॅटफॉर्म पासून सुरुवात करून, भारतीय तटरक्षक दलाने 156 जहाजे आणि 62 विमानांसह शक्तिशाली सैन्य दलापर्यंत आपल्या क्षमता वाढविल्या आणि आता येत्या 2025 पर्यंत 200 सरफेस प्लॅटफॉर्मचे आणि 80 विमानांचे दल हे  लक्ष्य  गाठण्याची शक्यता आहे. 

जगातील चौथ्या क्रमांकाचा तटरक्षक दल म्हणून भारतीय तटरक्षक दलाने भारतीय सागरी किनारे सुरक्षित करण्यासाठी आणि सागरी क्षेत्रातील  नियमांची अंमलबजावणी करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. वयम रक्षमाह म्हणजेच आम्ही रक्षण करतो हे उद्दिष्ट सार्थ ठरवत, 1977 पासून 10,000 लोकांचे प्राण वाचविण्याचे श्रेय आणि जवळपास 14,000 समाजकंटकांना  पकडण्याचे श्रेय यांच्या नावे आहे. तटरक्षक दलाने दर दुसऱ्या दिवशी सरासरी एका व्यक्तीचे प्राण खोल समुद्रात वाचवले आहेत.

देशभर कोविड- 19 महामारी पसरल्यामुळे निर्बंध आलेले असताना देखील, भारतीय तटरक्षक दलाने विशेष आर्थिक क्षेत्रात दररोज सुमारे 50 जहाजे आणि 12 विमाने तैनात करून 24 तास दक्षता राखली आहे. सागरी क्षेत्रात जहाजं आणि हवाई सेवेद्वारे   समन्वयित पाळत ठेऊन सुमारे 1500 कोटी रुपये किमतीच्या प्रतिबंधित  साहित्य जप्त केले

 सन 2020 मध्ये एकट्या भारतीय  ईईझेड क्षेत्रामध्ये उपद्रव निर्माण करणाऱ्या  10 पेक्षा अधिक परदेशी मासेमारी नौका आणि 80 बेकायदेशीररित्या कार्यरत असलेल्या व्यक्तींसह हस्तगत करण्यात आल्या. प्रतिबंधात्मक आणि प्रमाणबद्ध प्रतिसादया पद्धतीने कारवाई करण्याच्या भूमिकेला अवघ्या एक वर्षापूर्वी प्रारंभ झाला, मागील र्षी 11 चक्रीवादळे झाल्यामुळे सुमारे 40,000 मासेमार असलेल्या 6,000 पेक्षा अधिक मासेमारी नौका  बंदरात सुरक्षितपणे  नेण्यात आल्या, त्यामुळे समुद्रावरील जीवित आणि अन्य मालमत्तेचे नुकसान टळले.

माननीय पंतप्रधानांच्या क्षेत्रीय सुरक्षा आणि सर्वंकष विकास या दृष्टिकोनास अनुसरून म्हणजेच सागर- सिक्युरिटी अँड ग्रोथ फॉर ऑल इन द रिजन या मोहिमेस अनुसरून भारतीय तटरक्षक दलाने श्रीलंकेच्या जवळपास 3 लाख टन कच्चे तेल वाहून नेणाऱ्या 333 मीटर लांबीच्या अतिविशाल क्रूड कॅरिअर मोटर टँकर न्यू डायमंडवर आगलेली आग आटोक्यात आणून एक मोठी पर्यावरणीय आपत्ती टाळत सागरी क्षेत्रात इतिहास घडविला.

सागरी  क्षेत्र आणि नागरी हवाई  यांच्या शोध आणि बचाव यंत्रणे चा परस्पर समन्वव्य साधण्यासाठी, भारतीय तटरक्षक दलाने राष्ट्रीय सागरी शोध आणि बचाव मंडळाची बैठक आयोजित केली आणि जन-बचाव कार्य हाती घेण्याच्या सध्याच्या यंत्रणेस मान्यता देण्यासाठी एसएआर कार्यवाही- 2020 (एसएआरईएक्स – 2020)  SAR Exercise-2020 (SAREX-2020)  चा पाठपुरावा केला.

राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान आणि संरक्षण मंत्री यांनी भारतीय तटरक्षक दलाचे 44 तेजस्वी वर्षांची सेवा पूर्ण केल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले आणि सागरी क्षेत्रातील देशाच्या हिताच्या अनुषंगाने असलेल्या सेवेचे कौतुक केले.

 

Jaydevi P.S/S.Shaikh/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1693695) Visitor Counter : 193