आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

जागतिक आर्थिक मंचाच्या सामायिक विश्वास नेटवर्कच्या माध्यमातून सीमेपलिकडून गतिशीलता पूर्ववत करण्यासंबंधी कार्यक्रमाला डॉ. हर्ष वर्धन यांनी संबोधित केले

Posted On: 28 JAN 2021 7:25PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 28 जानेवारी 2021

 

केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री डॉ हर्ष वर्धन यांनी जागतिक आर्थिक मंचाच्या सामायिक विश्वास नेटवर्कच्या माध्यमातून सीमेपलिकडून गतिशीलता पूर्ववत करण्यासंबंधीच्या कार्यक्रमाला व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संबोधित केले.

सीमा पुन्हा खुल्या करण्यासाठी आवश्यक असलेली धोरणे, पद्धती आणि भागीदारी यावर चर्चा करणे तसेच सुरक्षित आणि शाश्वत  मार्गाने आवश्यक प्रवास, पर्यटन आणि वाणिज्य सेवा सक्षम करणे, हा या कार्यक्रमाचा उद्देश होता.

सीमेपलिकडील व्यवहारांवर कोविड -19 चा  कसा परिणाम झाला हे अधोरेखित करताना केंद्रीय मंत्री म्हणाले, कोविड-19 महामारीने  जागतिक अर्थव्यवस्थेचे मोठे नुकसान केले आहे, ज्याचा परिणाम सर्व समुदाय आणि व्यक्तींवर  झाला आहे. पुरवठा साखळ्यांनाही त्याचा मोठा फटका बसला असून व्यापार आणि विकासावर मोठ्या प्रमाणात परिणाम झाला आहे. जागतिक अर्थव्यवस्थेच्या मुख्य मार्गिकांसह सीमेपलिकडून जलद गतीने व्यवहार सुरु करत असताना, विषाणूच्या प्रसाराला जागतिकीकरणाच्या मूलभूत परस्पर जोडणीचा फायदा  झाला आणि जागतिक आरोग्य संकटाचे रूपांतर जागतिक आर्थिक संकटात झाले ज्यामुळे सर्वात असुरक्षित घटकांवर मोठा आघात झाला.

आंतरराष्ट्रीय प्रवासाची समस्या सोडवण्याच्या उपाययोजना आणि मार्ग या प्रश्नावर बोलताना डॉ. हर्ष वर्धन म्हणाले, आंतरराष्ट्रीय विमान वाहतूक  संघटना (आयएटीए) आणि युरोपमधील काही देश, प्रवासावरील निर्बंध कमी करण्यासाठी कोविड -19  लसीकरण आधारित इम्म्युनिटी पासपोर्ट / ट्रॅव्हल पासेसच्या कल्पनेवर विचार करत आहेत. त्यामुळे   सध्या त्यावर भाष्य करणे योग्य नाही. वरील बाबी लक्षात घेता, आम्ही या दृष्टीने पुढील निर्णय घेण्यासाठी अजून काही काळ वाट पाहत आहोत.

अधिक तपशीलासाठी कृपया पहा

M.Pange /S.Kane/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1693002) Visitor Counter : 235